सध्या छोट्या पडद्यावर गाजत असलेली मालिका म्हणजे ‘आई माझी काळुबाई’. या मालिकेच्या माध्यमातून देवी काळुबाईच्या महतीचं वर्णन करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या ही मालिका अनेकांची लोकप्रिय ठरत आहे. विशेष म्हणजे लवकरच या मालिकेत आता एका लोकप्रिय अभिनेत्रीची एण्ट्री होणार आहे.
‘आई माझी काळुबाई’ या मालिकेत सध्या अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड मुख्य भूमिकेत झळकत असल्याचं दिसून येत आहे. मात्र, आता यापुढे प्राजक्ता या मालिकेत झळकणार नसून तिच्या जागी अभिनेत्री वीणा जगताप ‘आर्या’ ही भूमिका साकारणार आहे.
चित्रीकरणाच्या वेळा जमत नसल्यामुळे आणि अन्य कारणामुळे प्राजक्ताने ही मालिका सोडली असून तिच्या जागी वीणा जगतापला रिप्लेस करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे वीणाला नव्या रुपात पाहण्यासाठी प्रेक्षक आतूर झाले आहेत.
दरम्यान, ‘राधा प्रेम रंगी रंगली’, ‘बिग बॉस २’ या लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये वीणा झळकली असून आज तिचा अफाट मोठा चाहता वर्ग असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे आता ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेत वीणाला पुन्हा एकदा नव्या रुपात पाहण्यासाठी चाहते उत्सुक असल्याचं दिसून येत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 2, 2020 5:20 pm