News Flash

indian idol 12 : …म्हणून पद्मिनी कोल्हापुरेंनी सायलीला दिलं ‘हे’ मराठमोळं गिफ्ट

जाणून घ्या, पद्मिनी कोल्हापुरेंनी कोणतं गिफ्ट दिलं

गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचं अवितरतपणे मनोरंजन करणारा कार्यक्रम म्हणजे ‘इंडियन आयडॉल’. या शोच्या माध्यमातून कलाविश्वाला अनेक गायक मिळालं. सध्या या शोचं हे १२ वं पर्व सुरु आहे. छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या या शोमध्ये काही मराठी स्पर्धकदेखील सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे हे स्पर्धक त्यांच्या आवाजाने कानसेनांची मनं जिंकत आहेत. केवळ कानसेनांचीच नव्हे, तर आता हे स्पर्धक सेलिब्रिटींचीदेखील मनं जिंकू लागले आहेत.

अलिकडेच झालेल्या भागात अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे आणि पूनम ढिल्लन यांनी ‘इंडियन आयडॉल’च्या सेटवर हजेरी लावली होती. यावेळी सायलीने ‘प्यार किया नहीं जाता’ आणि ‘ये वादा रहा’ ही दोन सदाबहार गाणी सादर केली. विशेष म्हणजे सायलीचं हे गाणं पद्मिनी कोल्हापुरे यांनी विशेष भावलं असून त्यांनी एक खास मराठमोळं गिफ्ट सायलीला भेट म्हणून दिलं आहे.

वाचा : ‘या’ कारणामुळे मान्यताने नाकारलं संजयने दिलेलं १०० कोटींचं गिफ्ट

पद्मिनी कोल्हापुरे यांनी सायलीला मराठमोळी ठसकेबाज नथ आणि बिंदी भेट म्हणून दिली. त्यामुळे सायलीचा आनंद गगनात मावत नव्हता.
“एवढ्या मोठ्या कलाकारांसमोर गाणे सादर करण्याची संधी ‘इंडियन आयडॉल’मुळे मिळाली हे माझं भाग्य आहे. त्यातच पद्मिनी मॅमकडून हे विशेष गिफ्ट मिळणे म्हणजे एखादा आशीर्वाद मिळाल्यासारखेच आहे. माझ्यावर तसेच माझ्या गाण्यावर विश्वास ठेवणाऱ्या कुणालाही मी निराश करणार नाही,” असं सायली यावेळी म्हणाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2021 1:06 pm

Web Title: tv show indian idol 12 bollywood actress padmini kolhapure special gift for sayali ssj 93
Next Stories
1 अजय देवगण तर चमचा; शेतकरी आंदोलनासंदर्भातील ट्वीटनंतर गायकाचा टोला
2 दया बेनची ‘तारक मेहता…’मध्ये एण्ट्री, केली शूटिंगला सुरुवात?
3 ‘या’ कारणामुळे मान्यताने नाकारलं संजयने दिलेलं १०० कोटींचं गिफ्ट
Just Now!
X