छोट्या पडद्यावर सध्या ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’ हा रिअॅलिटी शो चांगलाच गाजत आहे. कमी कालावधीत हा शो लोकप्रिय झाला आहे. आपल्यातील गुणवत्ता आणि कला दाखवण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. त्यामुळे पूजा सावंत आणि धर्मेश सर यांच्यासोबतच अनेक सेलिब्रिटी येऊन या स्पर्धकांना प्रोत्साहन देत असतात. यामध्येच आता मराठी कलाविश्वातील असाच एक अभिनेता या शोमध्ये हजेरी लावणार आहे.

‘दगडी चाळ’, ‘धुरळा’, ‘दुनियादारी’ असे असंख्य चित्रपट गाजावणारा अभिनेता अंकुश चौधरी लवकरच महाराष्ट्राज बेस्ट डान्सर या शोमध्ये हजेरी लावणार आहे. यावेळी तो स्पर्धकांचा उत्साह वाढवणार असून त्यांना जिंकण्यासाठी प्रोत्साहन देणार आहे.

पाहा : बॉलिवूडचे ‘हे’ सुपरस्टार आहेत गंभीर आजारांनी त्रस्त

वाचा : जामीन मिळाल्यानंतर रियाची पार्टीला हजेरी; मित्राने शेअर केला फोटो

दरम्यान, येत्या ११- १२ जानेवारी रोजी रंगणाऱ्या भागात अंकुश सहभागी होणार आहे. या आठवड्यात प्रेमाची गाणी ही थीम असणार आहे. या शोच्या परिक्षकपदाची जबाबदारी अभिनेत्री पूजा सावंत आणि धर्मेश सर पार पाडत आहेत. विशेष म्हणजे या शोच्या निमित्ताने पूजा सावंत आणि धर्मेश सर पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. ‘बुगी वुगी’ या डान्स रिअॅलिटी शोमध्ये दोघांनी स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता.