News Flash

वडिलांच्या इच्छेखातर धर्मेशने केलं ‘हे’ काम

धर्मेशने पूर्ण केली वडिलांची इच्छा

बॉलिवूडमधील धर्मेश सर हे नाव कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. आपल्या नृत्यशैलीमुळे अनेकांना मोहित करणारा धर्मेश आज कलाविश्वातील नावाजलेल्या व्यक्तींपैकी एक आहे. विविध रिअॅलिटी शो, चित्रपटांमध्ये झळकलेला धर्मेश सध्या छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’ या शोच्या परिक्षकपदाची जाबबदारी पार पाडत आहे. अलिकडेच झालेल्या भागात धर्मेशच्या वडिलांनी या शोच्या मंचावर हजेरी लावली होती. यावेळी बोलत असताना त्यांनी धर्मेशबद्दल अनेक गोष्टींचा खुलासा केला.

अलिकडेच झालेल्या भागात प्रथमेश आणि आकाश या गुरु-शिष्याच्या जोडीने एक धमाकेदार परफॉर्मन्स दिला. यात त्यांनी धर्मेशच्या जीवनाचा पूर्ण प्रवास मांडण्याचा प्रयत्न केला. यात धर्मेशला त्याच्या खडतर प्रवासात त्याच्या वडिलांनी कशी साथ दिली यावर प्रकाश टाकण्यात आला होता. विशेष म्हणजे या परफॉर्मन्सनंतर धर्मेशच्या वडिलांनी मंचावर हजेरी लावली.

 

View this post on Instagram

 

A post shared by D (@dharmesh0011)

‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’ या मंचावर धर्मेशच्या वडिलांनी धर्मेशविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला. यात धर्मेशने एखाद्या मराठी कार्यक्रमाचं परीक्षण करावं अशी त्यांची फार इच्छा होती. विशेष म्हणजे धर्मेशने ती इच्छा पूर्ण केली असं त्यांनी सांगितलं. यावेळी वडिलांना ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’च्या मंचावर पाहिल्यानंतर धर्मेश भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2021 3:19 pm

Web Title: tv show maharashtras best dancer dharmesh sir and his father ssj 93
Next Stories
1 प्रेक्षकांसाठी विशाखा सुभेदारचा नवा संकल्प; नव्या वर्षात करणार ‘ही’ गोष्ट
2 Video: लग्नाविषयी विचारताच श्रद्धा कपूरने दिले मराठीत उत्तर, म्हणाली…
3 ‘Wasteman’म्हणत पंजाबी गायकाने सुनील शेट्टीला सुनावलं
Just Now!
X