News Flash

टॉपलेस फोटोवर येणाऱ्या विचित्र कमेंट्समुळे टीना दत्तने उचललं हे पाऊल; ट्रोलर म्हणाला, “ताई, माफ करा”

टॉपलेस फोटोंवर युजरने केली अश्लील कमेंट

सेलिब्रिटींना त्यांच्या चाहत्यांशी संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडिया हे एक उत्तम माध्यम आहे. पण ज्यावेळी सोशल मीडियावर सेलिब्रिटींच्या फोटो आणि व्हिडीओजवर विचित्र कमेंट्स आणि अपशब्द लिहितात, त्या कमेंट्स सेक्शनमध्ये सोशल मीडियाचा खरा चेहरा दिसून येतो. असंच काहीसं झालंय टीव्ही अभिनेत्री टीना दत्त हिच्यासोबत.

टीनाने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे टॉपलेस फोटोज शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंना नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे. पण काही युजर्सच्या विचित्र कमेंट्समुळे अभिनेत्री टीना दत्तला इन्स्टाग्राम अकाउंटची सेटिंग बदलावी लागली. टीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर कमेंट्स सेक्शनच बंद करून टाकलंय.

दोन दिवसांपूर्वी टीनाने तिचे टॉपलेस फोटोज शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं, “जर मी आणखी थोडं तापमान वाढवलं तर यात तुम्हाला काही हरकत नसेल ना ? मला असं वाटतं, येणाऱ्या नव्या महिन्यात थोडेफार बदल झाले पाहीजेत.” टीनाच्या या टॉपलेस फोटोंवर अनुज यदुवंशी नावाच्या एका युजरने खूपच अश्लील आणि विचित्र कमेंट केली. या कमेंटला स्वतः टीनाने तिच्या इन्स्टग्राम स्टोरीवर शेअर केलं आहे. युजरने दिलेल्या या अश्लील कमेंटचा स्क्रिनशॉट शेअर करताना टीनाने त्या युजरला आणि सायबर इनवेस्टिगेटरला देखील टॅग केलंय. यासोबत टीनाने लिहिलं, “याची वागणूक अशी नाही थांबणार…तु सगळ्याच महिलांसोबत अशाच पद्धतीने बोलतोस का ?”

 

View this post on Instagram

 

A post shared by Tinzi In TinzelTown (@tinadatta)

टीनाने या युजरला चांगलीच अद्दल घडवल्यानंतर थोड्या वेळानंतर युजरने टीनाची माफी देखील मागितली. त्याने चॅट बॉक्समध्ये मागितलेल्या माफीचा एक स्क्रिनशॉट टीनाने शेअर केलाय. ताई, मला यासाठी माफ करा, असं या युजरने लिहिलं आहे.

पण त्यानंतर टीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरचा कमेंट्स सेक्शन बंदच करून टाकला आहे. अभिनेत्री टीना दत्ता ही कलर्स टीव्हीवरील ‘उतरन’ मालिकेदरम्यान बरीच चर्चेत आली होती. त्यानंतर ती अनेक मालिका आणि रिअ‍ॅलिटी शोमध्ये दिसून आली. झी ५ अ‍ॅपवर रिलीज झालेल्या ‘नक्षलवादी’ चित्रपटात ती दिसून आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2021 10:03 pm

Web Title: tv uttaran actress tina datta closes comment sections after user abuses her for topless photoshoot troll apologizes later prp 93
Next Stories
1 आमिर खानच्या मुलीचा बॉयफ्रेंडसोबतचा व्हिडीओ व्हायरल; वडिलांच्या फिटनेस ट्रेनरसोबत आयराचं अफेअर
2 वाजिद खानच्या पत्नीनं १६ कोटी रुपयांच्या संपत्तीसाठी ठोठावला न्यायालयाचा दरवाजा
3 मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर दिशाने पहिल्यांदा केली पोस्ट
Just Now!
X