22 July 2019

News Flash

Video : पाहा ‘ट्रिपलिंग २’चा ट्रेलर; भावंडांच्या रोड ट्रीपची धमाल

या सीरिजचे सर्व भाग ५ एप्रिलपासून सोनी लिव्ह आणि टीव्हीएफ प्लेवर लाइव्ह असतील.

'ट्रिपलिंग २'

भावंडांच्या क्रेझी ट्रिपची धमाल घेऊन ‘ट्रिपलिंग २’ ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘ट्रिपलिंग’ ही वेब सीरिज तरुणाईमध्ये खूप गाजली होती. पहिल्या पर्वाच्या यशानंतर याच्या दुसऱ्या भागाची जोरदार मागणी होती. दुसऱ्या पर्वातही सुमीत व्यास, मानवी गगरू आणि अमोल पराशर यांची मुख्य भूमिका आहे.

रोड ट्रिप, भावंडांचे प्रेम आणि वेड्यासारखं भांडणं… हा ट्रेलर पाहून वेब सीरिजची उत्सुकता आणखी वाढते. या दुसऱ्या पर्वात चंदन, चंचल आणि चित्‍वनची कथा आणखी पुढे जाते. या प्रवासात ही भावंडं अनेक गमतीशीर गोष्टींसोबतच त्यांच्या नात्यातील नवे पैलू अनुभवणार आहेत.

समीर सक्सेना दिग्दर्शित आणि आकर्ष खुराणा व सुमीत व्यास लिखित या सीरिजमध्ये कुणाल रॉय कपूरही दिसणार आहेत. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील तोल सांभाळणाऱ्या या भावंडांच्या आयुष्याची झलक या ट्रेलरमधून दिसते. लेखक बनलेला चंदन पुन्हा एकदा आपल्या बहिणीच्या, चंचलच्या संपर्कात येतो. चंचल आता राजकारणी बनली आहे. चित्‍वनही यात सामील होतो. ही तीन भावंडे पुन्हा एकदा एका रोड ट्रिपवर निघतात.

या सीरिजचे सर्व भाग ५ एप्रिलपासून सोनी लिव्ह आणि टीव्हीएफ प्लेवर लाइव्ह असतील.

First Published on March 15, 2019 4:23 pm

Web Title: tvf tripling 2 trailer released road trip of siblings sumeet vyas amol parashar and maanvi gagroo