News Flash

धक्कादायक! अभिनेता आणि त्याच्या गर्लफ्रेंडचा संशयास्पद मृत्यू

अभिनेत्याचा घरातच सापडला मृतदेह

प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता ग्रेगरी टायरी बॉयस आणि त्याची गर्लफ्रेंड नेटली यांचा मृत्यू झाला आहे. ग्रेगरी ३० वर्षांचा होता. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप कळलेले नाही. ग्रेगरीचा भाऊ त्याला शोधण्यासाठी जेव्हा त्याच्या घरी पोहोचला तेव्हा ग्रेगरी आणि नेटली यांचा मृतदेह त्याने पाहिला. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार ग्रेगरी आणि त्याच्या गर्लफ्रेंडचा मृत्यू आठवडाभरापूर्वी झाला होता. त्यांचे मृतदेह तब्बल एक आठवडा घरातच पडून होते. ग्रेगरीचा भाऊ जेव्हा घरी पोहोचला तेव्हा त्याने दरवाजाबाहेर पडलेली वृत्तपत्र आणि काही पेपर्स पाहिले. त्यानंतर त्याने घरात प्रवेश केला. तेव्हा हॉलमध्येच त्याने दोघांचे मृतदेह पाहिले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतदेहाशेजारी त्यांना पांढऱ्या रंगाची पावडर सापडली. या पावडरमुळेच त्यांचा मृत्यू झाला की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे. पोलीस सध्या या प्रकरणाची कसून तपासणी करत आहेत. लवकरच या प्रकरणाचा उलघडा होईल असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

ग्रेगरी ‘ट्विलाईट’ या चित्रपटामुळे प्रसिद्ध झाला होता. त्याने या चित्रपटात टेलर क्राऊली ही व्यक्तिरेखा साकारली होती. या चित्रपट २००८मध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर त्याने ‘अपॉकेलप्स’ या एकमेव चित्रपटात काम केले. त्याला चित्रपटात काम मिळत नव्हते त्यामुळे काही काळ तो डिप्रेशनमध्ये देखील गेला होता. ग्रेगरीच्या मृत्यूमुळे हॉलिवूड सिनेसृष्टीत शोक व्यक्त केला जात आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाव्दारे त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 7:57 pm

Web Title: twilight actor gregory tyree boyce and girlfriend natalie adepoju found dead mppg 94
Next Stories
1 रिंकूचा साडीतला व्हिडीओ पाहून चाहत्याने घातली थेट लग्नाची मागणी
2 जॉर्डनमध्ये अडकलेला अभिनेता अखेर दोन महिन्यांनी परतला मायदेशी
3 पाकिस्तानातील विमान अपघातावर बॉलिवूड निर्मात्याची प्रतिक्रिया; म्हणाला…
Just Now!
X