News Flash

…या पुस्तकातुन ट्विंकल वाचकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणार

बॉलीवूडमधील अभिनयानंतर लेखिका बनलेल्या ट्विंकलने आपल्या दुसऱ्या पुस्तकाचे नाव केले जाहीर

अभिनयाला अलविदा केल्यानंतर ट्विंकल खन्ना लेखिकेच्या रुपात नवी भूमिका साकारत आहे.

अभिनयाच्या क्षेत्रापासून दुर झाल्यानंतर लेखिका बनलेली ट्विंकल खन्ना आपल्या दुसऱ्या पुस्तकाच्या तयारीला लागली आहे. ट्विंकलने नुकतेच आपल्या दुसऱ्या पुस्तकाचे नाव जाहीर केले. अभिनयाने चित्रपट रसिकांच्या मनावर ठसा उमटविल्यानंतर ट्विंकलने पुस्तकाच्या माध्यमातून व्यक्त होण्यास सुरुवात केली. ट्विंकले बुधवारी नव्या पुस्तकाचे नाव जाहीर केले. ‘द लिजेंड ऑफ लक्ष्मी प्रसाद’ या शिर्षकाखाली तिचे दुसरे पुस्तक लवकरच तिच्या चाहत्यांना वाचायला मिळणार आहे. या पुस्तकातील लेखन हे वाचकांना पोट धरुन हसायला भाग पाडेल, तर कधी लाजवून वाचकाच्या चेहऱ्यावरील रंग बदलवेल, असा विश्वास ट्विंकलने यावेळी व्यक्त केला.
बॉलीवूडमधील स्वर्गीय सुपरस्टार राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया या कलाकारांच्या घरात जन्मलेल्या ट्विंकलने आपला सुरुवातीचा प्रवास हा बॉलीवूडमधून केला. तिने बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारशी विवाह केल्यानंतर बॉलीवूडला अलविदा केला. मोठ्या पडद्यावरुन गायब झालेली ही प्रसिद्ध नायिका लेखिका बनून पुन्हा चाहत्यांच्या भेटीला आली. ‘मिसेस फन्नीबोन्स : शी इज जस्ट लाइक यू अॅण्ड अ लॉट लाइक मी’ या शिर्षकाखाली तिने आपले पहिले पुस्तक प्रकाशित केले होते. अभिनेता आणि ट्विंकलचा पती अक्षय कुमार तिच्या या पुस्तकाचा संपादक होता.
वाचकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी तिने लिहिलेले पुस्तक नोव्हेंबरमध्ये प्रकाशित होणार असून वाचकांसाठी या पुस्तकाच्या ऑनलाइन मागणीची प्रक्रिया नाव जाहीर केल्यानंतर खुली करण्यात आली आहे.

Crossing my toes:) Pre-order Amazon & Flipkart-1st week of Nov #TheLegendOfLakshmiPrasad https://t.co/jT8CkFgCSw https://t.co/r9XSnWIrjf pic.twitter.com/Sz6kJHGmr0

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2016 9:08 pm

Web Title: twinkle khanna announces name of his second book
Next Stories
1 ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर
2 … ही अभिनेत्री दाखवून देणार बांगलादेशी निर्वासितांच्या यातना
3 सोनमचा भावाला दिलेला हा सल्ला ऐकून तुम्हीही व्हाल चकित
Just Now!
X