News Flash

ट्विंकल खन्नाने जग्गी वासुदेव यांना हिमासंदर्भातील ट्विटवरुन केलं लक्ष्य

ट्विंकल अनेक वेळा सोशल नेटवर्किंगवर उघडपणे आपली मत मांडत असते

भारताची आघाडीची धावपटू हिमा दासने परदेशात अवघ्या १९ दिवसांच्या कालावधीमध्ये ५ सुवर्णपदकांची कमाई करत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. त्यानंतर आता आगामी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत अशीच कामगिरी करत ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचं हिमा दासचं स्वप्न आहे. हिमाने केलेल्या या यशस्वी कामगिरीनंतर सर्व स्तरांमधून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यातच आध्यात्मिक गुरू जग्गी वासुदेव यांनीदेखील हिमाला शुभेच्छा दिल्या. मात्र त्यांच्या या शुभेच्छा अभिनेत्री ट्विंकल खन्नाला फारशा रुचलेल्या दिसत नाहीत. त्यामुळेच तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना टोला लगावला आहे.

‘हिमा दासला अनेक शुभेच्छा आणि अभिनंदन, हिमा दास भारतासाठी गोल्डन शॉवर आहे’, असं ट्विट जग्गी वासुदेव यांनी केलं. त्यांचं हे ट्विट सध्या चांगलचं व्हायरल झालं असून ‘गोल्डन शॉवर’ या शब्दावरुन सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यातच अभिनेत्री ट्विंकल खन्नानेदेखील तिच मत मांडत जग्गी वासुदेव यांना टोला लगावला आहे.

‘..आणि आम्हाला वाटत होतं की आमच्याकडे केवळ गोमूत्रचं आहे!’, असं ट्विट करुन ट्विंकलने जग्गी सदगुरु यांना टोला लगावला. मात्र ट्विंकलचं हे ट्विट पाहिल्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर ट्विंकलच्या ट्विटची चर्चा रंगल्यानंतर तिला हे ट्विट डिलीट करावं लागलं.

दरम्यान, अभिनेत्री, लेखिका आणि निर्माती असणारी ट्विंकल कायम सोशल मीडियावर चर्चेत येत असते. ट्विंकल अनेक वेळा सोशल नेटवर्किंगवर उघडपणे आपली मत मांडत असते. मात्र तिच्या या स्पष्टवक्तेपणामुळे अनेक वेळा तिला अडचणींचाही सामना करावा लागतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2019 10:10 am

Web Title: twinkle khanna faces flak for her latest tweet on sadhgurus golden shower post for hima das ssj 93
Next Stories
1 ‘इन्स्टाग्राम’ श्रीमंतांच्या यादीत प्रियांकाने विराटलाही टाकलं मागे; एका पोस्टसाठी आकारते इतके रुपये
2 Kargil Vijay Diwas : जाणून घ्या, कारगिल युद्धाचं बॉलिवूड कनेक्शन!
3 Photo : साहो चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित
Just Now!
X