अभिनेत्री, लेखिका आणि निर्माती ट्विंकल खन्ना ही आपली मते बेधडकपणे मांडण्यासाठी लोकप्रिय आहे. ब्लॉग, ट्विटरच्या माध्यमातून उपरोधिकपणे सद्यस्थितीवर आपली मतं मांडण्यासाठी ती प्रसिद्ध आहे. ट्विंकलने तिच्यात शैलीत पुन्हा एकदा कांद्याच्या किंमतीवरून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना टोला लगावला आहे. तिने सोशल मीडियावर कांदा या विषयावर ब्लॉग लिहिला आहे.

या ब्लॉगमध्ये तिने कांद्याची तुलना अॅव्होकाडो या फळाशी केली आहे. अॅव्होकाडो हे अत्यंत महागडे फळ आहे. या लेखात तिने निर्मला सीतारामन यांनी संसदेत कांद्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याचा उपरोधिक समाचार घेतला आहे. “तरी बरं, निर्मला सीतारामन यांनी कांद्याच्या किंमतीवर बोलताना फ्रान्सची क्वीन मेरी अँटॉइनसारखं ‘कांदा नाही तर कांदाभजी खा’ असं काही म्हणाल्या नाहीत”, अशी खोचक टीका तिने केली.

इतकंच नव्हे तर तर तिने तिच्या ब्लॉगमध्ये कांद्याचा वापर न करता बनवता येतील अशा काही स्वयंपाककृती दिल्या आहेत. यामध्ये चिकन करी, राजमा, मटण खीमा, पावभाजी, वांग्याचे भरीत अशा रेसिपींचा समावेश आहे.

आणखी वाचा : अखेर अक्षयला मिळणार भारताचं नागरिकत्व; घेतला हा मोठा निर्णय

संसदेत चर्चेदरम्यान कांद्याच्या वाढत्या दराबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना सवाल करण्यात आला होता. यावर निर्मला सीतारामन यांनी आपले कुटुंबीय कांदा, लसूणसारखे पदार्थ जास्त खात नसल्याचं अजब स्पष्टीकरण दिलं होतं.