ट्विंकल खन्ना ९०च्या दशकात बॉलिवूडमधील आघाडिच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जायची. त्यावेळी ‘बरसात’, ‘जान’, ‘बादशाह’ यांसाख्या सुपरहिट चित्रपटांमुळे तिच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली होती. परंतु ‘मेला’ या चित्रपटामुळे तिचं करिअर एकाएकी संपलं. आज २० वर्षानंतरही ट्विंकच्या मनातील या चित्रपटाबाबतची नाराजी गेलेली नाही. तिने नुकताच एक फोटो शेअर करुन ‘मेला’ या चित्रपटाबाबत आपला संताप व्यक्त केला.
अवश्य पाहा – ‘म्हशीचं हंबरणं चालेल पण हे गाणं नको’; अमृता फडणवीसांच्या गाण्यावर मराठी कलाकाराची टीका
ट्विंकलने चित्रपटातील खलनायक गुर्जरचं एक पोस्टर ट्रकवर पाहिलं. या ट्रकचा फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. “काही गोष्टी या टाईमलेस असतात. ज्यांना तुम्ही कधीही विसरु शकत नाही. मेला या चित्रपटामुळं माझ्या करिअरवर कधीही पुसला न जाणारा डाग लागला. तुम्हाला पाहाचंय तर हा चित्रपट पाहा..” अशा आशयाची कॉमेंट लिहून तिने आपली नाराजी व्यक्त केली. तिची पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
अवश्य पाहा – VIDEO: कर्करोगग्रस्त अभिनेता देतोय मृत्यूशी झुंज; चाहत्यांकडे मागितली आर्थिक मदत
View this post on Instagram
अवश्य पाहा – पत्नीशी अफेअर असल्याच्या संशयावरून प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याची हत्या
‘मेला’ हा चित्रपट २००० साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात ट्विंकलसोबत आमिर खान आणि फैजल खान यांनी मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. गुर्जर नावाच्या एका डाकूला रुपा म्हणजेच ट्विंकलसोबत लग्न करायचं आहे. त्यासाठी तो तिच्या भावाला देखील मारतो. परंतु रुपा त्या डाकूच्या तावडीतून सुटते अन् किशन (आमिर) आणि शंकरला (फैजल) येऊन भेटते. पुढे ती त्या दोघांच्या मदतीने डाकूला मारते व संपूर्ण गावाला त्याच्या दहशतीतून मुक्त करते. हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला. त्यावेळी अनेक समिक्षकांनी या चित्रपटाची खिल्ली उडवली होती. या फ्लॉप चित्रपटानंतर ट्विंकलला केवळ चार चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. परंतु दुदैवाने तिचे हे चारही चित्रपट फ्लॉप झाले. परिणामी तिने सिनेसृष्टीला कायमचा रामराम ठोकला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 18, 2020 11:27 am