News Flash

घरच्या ‘जिम्नॅस्ट’मुळं हैराण आहे ट्विंकल खन्ना; म्हणते हिच्यापेक्षा त्रास देणारे शेजारी बरे!

भन्नाट कॅप्शनसह सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ...

करोना महामारीमुळं बऱ्याच जणांचं वर्क फ्रॉम होम सुरु आहे. आता घरात मुलं असतील तर मात्र घरी काम करणं हे महाकठीण काम…फक्त तुम्हा आम्हा सामान्यांनाच हा अनुभव येतो असं नाही बरं का….अभिनेत्री आणि अक्षयकुमारची पत्नी ट्विंकल खन्नाही हेच म्हणत आहे. काम करत असताना तिलाही तिची मुलगी भरपूर त्रास देत आहे. तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये ट्विंकलची ८ वर्षांची मुलगी नितारा बेडवर कशाही उड्या मारताना, दंगा करताना दिसत आहे तर ट्विंकल आपल्या लॅपटॉपवर काम करताना दिसत आहे. नितारा वाटेल तशा उड्या मारत आहे, मोठमोठ्याने काहीतरी गात आहे. ट्विंकल तिला म्हणते की, अगं तुला आज काही शाळा वगैरे नाही का? तू माझ्या खोलीत काय करत आहेस?

 

View this post on Instagram

 

A post shared by Twinkle Khanna (@twinklerkhanna)

ट्विंकल आपल्या फोटोंना कम्माल कॅप्शन देत असते. तिचे हे कॅप्शन्स कायम चर्चेचा विषय ठरतात. या व्हिडिओलाही तिनं कॅप्शन दिलं आहे. ”मी लिहित असताना आमचे शेजारी भितींत काहीतरी ड्रील करत असणं हे पुरेसं नव्हतं का की मला आता माझ्या बेडवरचा जिम्नॅस्ट आणि त्याच्यामुळे हलणारा माझा लॅपटॉपही सांभाळावा लागत आहे. पालकांवार दया करून शाळा या मुलांना परत नेईल का?”, अशा आशयाचं हे कॅप्शन आहे.

ट्विंकल कायम नितारासोबतचे फोटो पोस्ट करत असते. कधी ती आपल्या कुत्र्याला अंघोळ घालत असते तर कधी ती तिचं वाचन पूर्ण करत असते. गेल्याच महिन्यात ट्विंकल आणि नितारा दोघीही पुस्तक वाचत असतानाचा फोटोही ट्विंकलने शेअर केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Twinkle Khanna (@twinklerkhanna)

अभिनेत्री ट्विंकल खन्नाने 2001 साली अक्षय कुमारशी लग्न केलं. त्यांना दोन मुलं आहेत, मोठा आरव आणि छोटी नितारा. ट्विंकलने सुरुवातीच्या काळात इंटरनॅशनल खिलाडी, बादशाह, ये है मुंबई मेरी जान, उफ्फ ये महोब्बत , जोरू का गुलाम अशा काही चित्रपटांमध्ये काम केलं. त्यानंतर ती आता बेस्टसेलर पुस्तकांची लेखिका बनली आहे. ती सध्या निर्माती, इंटेरियर डिझायनर, स्तंभलेखिका आणि लेखिकाही आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2021 7:38 pm

Web Title: twinkle khanna shares the reality of work from home vsk 98
Next Stories
1 ‘हिरोपंती २’चं पोस्टर कॉपी केलं? टायगर श्रॉफ झाला ट्रोल
2 धकधक गर्लची ओटीटी प्लॅटफॉर्मवर एण्ट्री, माधुरी घेणार ‘आनामिका’चा शोध
3 ‘मी माझे तरुणपण पुन्हा जगतो आहे’- दर्शन जरीवाला
Just Now!
X