News Flash

समलैंगिक संबंधांवर भाष्य करणाऱ्या ‘३७७ अब नॉर्मल’ चित्रपटाची नेटकऱ्यांकडून प्रशंसा

सोशल मीडियावर '३७७ अब नॉर्मल'चीच चर्चा

३७७ अब नॉर्मल

परस्पर संमतीने ठेवल्या जाणाऱ्या समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणाऱ्या भारतीय दंड विधानाच्या (आयपीसी) कलम ३७७ च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर गेल्यावर्षी सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. समलैंगिकांनाही समान अधिकार आहेत, त्यामुळे दोन सज्ञान व्यक्तींनी ठेवलेले संबंध ही खासगी बाब आहे, त्यामुळे तो गुन्हा ठरत नाही, असा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला होता. या ऐतिहासिक निर्णयानंतर देशभरात जल्लोष झाला. आता यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘३७७ अब नॉर्मल’ असं या चित्रपटाचं नाव असून ZEE5 वर तो प्रदर्शित करण्यात आला आहे. नेटकऱ्यांना हा चित्रपट आवडला असून सध्या सोशल मीडियावर त्याचीच चर्चा सुरू आहे.

चित्रपटात मानवी गगरू, तन्वी आझमी, झीशान अयुब, कुमुद मिश्रा आणि शशांक अरोरा यांच्या मुख्य भूमिका आहेत. १३ मार्च रोजी याचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. त्यालाही सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळाला होता. समलिंगी संबंधांना कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी दाखल केलेली याचिका आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयापर्यंतचा प्रवास या चित्रपटात अधोरेखित करण्यात आला आहे.

पाहा चित्रपटाचा ट्रेलर- 

Next Stories
1 सुशांतनं साराला केलं अनफॉलो
2 Filmfare Awards : त्यापेक्षा पुरस्कार न मिळालेला बरा, ‘बधाई हो’च्या लेखकांची नामांकनातून माघार
3 सलमानने ‘ट्युबलाइट’च्या अपयशाचं खापर फोडलं प्रदर्शनाच्या तारखेवर
Just Now!
X