News Flash

अक्षय विरुद्ध प्रभास: १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार ‘हे’ दोन मोठे चित्रपट

स्वातंत्र्यदिनी दोन मोठे चित्रपट प्रदर्शित होणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु होत्या

अक्षय कुमार आणि प्रभास

गेल्या काही दिवसांपासून स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट २०१९ रोजी दोन मोठे चित्रपट प्रदर्शित होणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु होत्या. या चित्रपटांच्या निमित्ताने प्रभास आणि अक्षय कुमार रुपेरी पडद्यावर ऐकमेकांना भिडणार असे देखील म्हटले जात होते. यामध्ये दाक्षिणात्य अभिनेता प्रभाचा ‘साहो’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे तर दुसरीकडे अक्षय कुमारचा मिशन मंगल प्रदर्शित होणार आहे. कोणता चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

यापूर्वी ‘मिशन मंगल’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्यात येणार असल्याचे म्हटले जात होते. परंतु आता चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटद्वारे ‘मिशन मंगल’ चित्रपटाच्या तारखेत बदल होणार नसल्याचे सांगितले. ‘ही एक अधिकृत घोषणा आहे. मिशन मंगलच्या प्रदर्शनाची तारिख बदलली जाणार नाही. हा चित्रपट १५ ऑगस्ट २०१९ रोजी प्रदर्शित होणार’ असे त्यांनी ट्विटमध्ये लिहिले होते.

‘बाहुबली’नंतर अभिनेता प्रभासच्या आगामी ‘साहो’ या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये बरीच उत्सुकता आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. जवळपास दीड मिनिटाच्या या टीझरमध्ये अॅक्शनचा भरणा आहे. टीझरच्या सुरुवातीलाच श्रद्धा कपूर पाहायला मिळते. प्रभास व श्रद्धा पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करत आहेत. त्याचसोबत नील नितीन मुकेश, चंकी पांडे, महेश मांजरेकर यांचीही टीझरमध्ये झलक आहे.

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा ‘मिशन मंगल’ आर. बाल्की आणि जगन शक्ती यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत आहे. तसेच या चित्रपटात भारताची मंगळ मोहिमेची खरी कथा दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसह अभिनेत्री विद्या बालन, तापसी पन्नू आणि सोनाक्षी सिन्हा देखील झळकणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2019 8:52 am

Web Title: two big movies are releasing on independence day avb 95
Next Stories
1 ‘मोगरा फुलला’मध्ये १४ वर्षांनंतर स्वप्नील जोशी – नीना कुलकर्णी एकत्र
2 Video : मध्यरात्री लूलिया वंतूरसोबत सलमानची सायकल राइड
3 बिग बॉसच्या घरात वीणा-शिवमध्ये ‘आखो कि गुस्ताखियां!’
Just Now!
X