News Flash

बोनी कपूर यांच्या घरातील आणखी दोघांना करोनाची लागण

यापूर्वी एका व्यक्तीला करोनाची लागण झाल्याचे समोर आले होते.

बोनी कपूर यांच्या घरातील आणखी दोघांना करोनाची लागण

काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया पोस्टद्वारे बोनी कपूर यांनी त्यांच्या घरात काम करणाऱ्या एका व्यक्तीची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याची माहिती दिली होती. आता त्यापाठोपाठ त्यांच्या घरातील आणखी दोन व्यक्तींची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे समोर आले आहे.

‘बॉम्बे टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार काही दिवसांपूर्वी बोनी कपूर यांच्या घरात काम करणाऱ्या एका व्यक्तीची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती. त्यानंतर घरातील इतर सदस्यांची करोना चाचणी करण्यात आली. आता या चाचणीचे रिपोर्ट्स समोर आले असून घरात काम करणाऱ्या आणखी दोन व्यक्तींना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सध्या बोनी कपूर हे त्यांची आणि दोन्ही मुलींची काळजी घेत आहेत. तसेच घरातील सर्व सदस्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

यापूर्वी बोनी कपूर यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे, ‘आमच्या घरात काम करणाऱ्या एका व्यक्तीची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. तो शनिवारी संध्याकाळपासून आजारी होता. त्यामुळे आम्ही त्याला करोना चाचणी करण्यासाठी पाठवले आणि त्याला आयसोलेशनमध्ये ठेवले. त्याची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे कळताच आम्ही त्याची माहिती सोसायटीमध्ये दिली’ अशी माहिती दिली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 12:02 pm

Web Title: two more members from boney kapoors home staff test positive for covid 19 avb 95
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 ‘इंडस्ट्री पुन्हा कधी सुरु होणार’; कार्तिक आर्यनचा प्रश्न
2 Video : ‘फुलपाखरु’ ते पर्सनल लाइफ… ऋता दुर्गुळेसोबत दिलखुलास गप्पा
3 ‘सत्य विकत घेता येत नाही’; नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीने व्यक्त केला संताप
Just Now!
X