News Flash

प्रभासच्या ‘साहो’ चित्रपटाच्या सेटवरील फोटो पाहिले का?

'बाहुबली' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रभासच्या चाहत्यांच्या संख्येत कमालीची वाढ झाली. त्यामुळे प्रभासच्या आगामी साहो चित्रपटाविषयी त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता दिसून येते.

प्रभास

एस. एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणावर गल्ला जमवल्यानंतर दाक्षिणात्य अभिनेता प्रभास हा विशेष प्रकाशझोतात आला. ‘बाहुबली’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रभासच्या चाहत्यांच्या संख्येत कमालीची वाढ झाली. त्यामुळे प्रभासच्या आगामी साहो चित्रपटाविषयी त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता दिसून येते. याच उत्सुकतेपोटी साहो चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो लीक झाले आहेत.

‘साहो’ चित्रपटाचे चित्रीकरण दुबईमध्ये सुरु असून चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो लीक झाले आहेत. लीक झालेल्या फोटोवरून प्रभास चित्रपटातील महत्त्वपूर्ण दृश्य चित्रीत करत असल्याचे म्हटले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटातील महत्त्वपूर्ण भाग यावेळी चित्रीत केला जात असून या भागात प्रभास कोणाचा तरी पाठलाग करताना दिसत आहे. या सीनमध्येच चित्रपटात दुबईतील महत्त्वाची ठिकाणं दिसणार असल्याचेही म्हटले जात आहे.

Latest from the sets of #Saaho! #Prabhas #ShraddhaKapoor

A post shared by FILMS AND FACTS (@filmsandfacts) on

चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रभासची लोकप्रियता पाहता या चित्रपटातील त्याचा लूक, चित्रपटाचे कथानक याविषयी गुप्तता पाळली आहे. मात्र तरीदेखील त्याचे सेटवरील काही फोटो सातत्याने लीक होत आहेत. या चित्रपटामध्ये प्रभासबरोबर अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि इव्हलिन शर्मा स्क्रिन शेअर करणार आहेत.

दरम्यान, साहो चित्रपटापूर्वी ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली २’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. या चित्रपटांमध्ये प्रभासह अनुष्का शेट्टी, सत्यराज आणि राणा डगुबत्ती झळकले होते. प्रभासने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखविली असून ‘साहो’ चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो की नाही हे तर येणारा काळच ठरवेल.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 11:25 am

Web Title: two pictures from prabhas starrer saaho have been leaked
Next Stories
1 नोव्हेंबरमध्ये अडकणार दीपिका-रणवीर विवाहबंधनात?
2 …म्हणून स्मृती इराणींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यास कलाकारांचा विरोध
3 म्हणून पुन्हा एकदा ट्विटरच्या कारभारावर भडकले अमिताभ बच्चन
Just Now!
X