16 December 2019

News Flash

Video : दोन वर्षांची गानकोकीळा; लता दीदींचे ‘हे’ गाणे ती हुबेहुब गाते

ही चिमुकली अतिशय मधूर आवाजात गाणे गात आहे

आजकाल सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल आणि एका रात्रीत कोणाचे आयुष्य बदलेल हे सांगू शकत नाही. याचे सर्वात चांगले उदाहरण म्हणजे पश्चिम बंगालमध्ये रानाघाट रेल्वे स्थानकावर गाणे गाणाऱ्या रानू मंडल. रानू मंडल यांचा लता मंगेशकर यांचे गाणे गातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलले. आता आणखी एका लहान मुलीचा गाणे गातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण ही चिमुकली केवळ दोन वर्षांची असल्याने सर्वांना आश्चर्य वाटत आहे.

ही दोन वर्षांची मुलगी लता मंगेश यांचे लोकप्रिय गाणे ‘लग जा गले’ गाताना दिसत आहे. हे गाणे १९६४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वो कौन थी’ चित्रपटामधील आहे. या छोट्या चिमुकलीचे नाव प्रज्ञा मेधा असल्याचे म्हटले जाते. ही चिमुकली अतिशय मधूर आवाजात हे गाणे गात असल्याचे पाहायला मिळते. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

#Musicon #lagjagale #latamangeshkarji #babygirl

A post shared by Pragya Medha (@pragyamedha11) on

काही दिवसांपूर्वी रेल्वे स्थानकावर लता मंगेशकर यांचे गाणे गाणाऱ्या रानू मंडल सध्या स्टार झाल्या आहेत. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अभिनेता, गायक हिमेश रेशमियाने त्याचा आगामी ‘हॅपी हर्डी और हीर’ चित्रपटात गाणे गाण्याची संधी दिली. त्यानंतर रानू यांना सोशल मीडियावर तुफान लोकप्रियता मिळाली. काही दिवसांपूर्वी त्यांना एका कार्यक्रमात गाणे गाण्यासाठी मंचावर बोलवण्यात आले होते. पण त्या गाणे विसल्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले.

First Published on December 3, 2019 10:50 am

Web Title: two year old girl sing lata mangeshkar song lag jaa gale goes viral on internet avb 95
Just Now!
X