News Flash

प्रेमाने जग जिंकता येते- राकेश बापट

आपल्या भारतीय संस्कृतीत या दिवसाला इतके महत्व नाही.

राकेश बापट

‘व्हॅलेन्टाईन डे’ आपण दरवर्षी साजरा करतो. आपल्या प्रिय व्यक्तींसाठी हा खास दिवस असतो. आपल्या भारतीय संस्कृतीत या दिवसाला इतके महत्व नसले तरी तरुणाईमध्ये या दिवसाची क्रेज जास्त पाहायला मिळते.  असे असले तरी, ‘व्हॅलेन्टाईन डे’ बद्दल मात्र माझी व्याख्या वेगळी आहे. आपल्याकडून दुखावले आणि दुरावले गेलेल्या लोकांना पुन्हा जवळ आणण्याचा प्रयत्न मी या दिवशी करतो. माझ्या पत्नीचे देखील ‘व्हॅलेन्टाईन डे’ बद्दल हेच मत आहे. जीवनात आनंदी राहायचे असेल तर पहिले स्वतःचे नातेसंबंध जपा.  प्रेमाने जग जिंकता येते. अर्थात, त्यासाठी आपल्याला चांगला माणूस होण गरजेच आहे. पाश्चिमात्य देशातून आपल्या भारतात आलेला ‘व्हॅलेन्टाईन डे’ देखील हाच संदेश आपल्याला देतो. त्यामुळे जर दररोज प्रेमाने वागलो तर रोजच आपण हा दिवस साजरा करू शकू. कुटुंबातील नातेसंबंध जपा आयुष्य ‘वृंदावन’ सारखे सुंदर होईल. माझा आगामी ‘वृंदावन’ हा एक कौटुंबिक सिनेमा असून त्यात हाच संदेश देण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2016 11:01 am

Web Title: u can win world by love says rakesh bapat on valentines day
टॅग : Valentines Day
Next Stories
1 माझा व्हॅलेन्टाईन माझ्यासाठी सुंदर स्वप्न – प्रार्थना बेहरे
2 ‘व्हॅलेंटाइन’ बॉलीवूड स्टाइल
3 कतरिना शिवाय ‘जग्गा जासूस’चे चित्रिकरण!
Just Now!
X