मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी मंगळवारी रात्री व्हिडीओ कॉन्फरंसद्वारे संपर्क साधला होता. या भाषणामध्ये त्यांनी जनतेला चक्रीवादळापासून सावधान राहण्याचा इशारा दिला. यावरुन अभिनेता अर्शद वारसी याने उद्धव ठाकरे यांच्या कामची स्तुती केली आहे. कार्यकालावधीच्या सुरुवातीलाच इतक्या मोठ्या संकटांचा सामना आजवर कुठल्याही मुख्यमंत्र्याने केला नव्हता असं त्याने म्हटले आहे.
I don’t think any CM has had to face such huge challenges right at the start of his term, as the @CMOMaharashtra. He barely settled in his office & had to deal with global pandemic in a crowded city like Mumbai and now a cyclone…
— Arshad Warsi (@ArshadWarsi) June 3, 2020
“मला नाही वाटत उद्धव ठाकरे यांच्या इतक्या संकटांचा सामना आजवर कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी कार्यकालावधीच्या सुरुवातीलाच केला असेल. सध्या मुंबई एका प्राणघातक विशाणूच्या विळख्यात अडकली आहे. हे कमी होतं की काय तेवढ्यात चक्रीवादळ येतय.” अशा आशयाचे ट्विट अर्शदने केलं आहे. त्याचं हे ट्विट चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
समुद्राला उधाण! संकटाचा सामना करण्यासाठी एनडीआरएफ सज्ज; ४०,००० नागरिकांना हलवलं
निसर्ग चक्रीवादळानं रौद्ररुप धारण केलं असून, किनारपट्टी भागासह राज्यात अनेक ठिकाणी वादळा पाऊस सुरू झाला आहे. वाऱ्याची गती वाढली असून, समुद्रालाही उधाण आलं आहे. लाटा किनाऱ्याला धडका मारू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जीवित हानी टाळण्यासाठी ४० हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी नेण्यात आलं आहे. तसेच किनारपट्टी भागात एनडीआरएफच्या तुकड्या मदत कार्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 3, 2020 1:28 pm