15 August 2020

News Flash

पाहा: उडता पंजाबचा ट्रेलर; शाहिद आणि आलिया हटके अंदाजात

आत्तापर्यंत रोमँटिक आणि ग्लॅमरस भूमिका साकारणाऱ्या आलियाचा या चित्रपटातील अवतार अनेकांना थक्क करणारा आहे.

Udta Punjab trailer : शेतात काम करताना उन्हात रापलेला आलियाचा चेहरा, तिचे बिहारी भाषेतील संवाद प्रेक्षकांसाठी सर्वस्वी नवा अनुभव आहे. याशिवाय, करिना कपूरने साकारलेली डॉ. शिवानी गुप्ताची भूमिकाही प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारी आहे.

शाहिद कपूर, आलिया भट आणि करिना कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या बहुचर्चित ‘उडता पंजाब’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. पंजाबमध्ये अमली पदार्थांच्या आहरी गेलेल्या तरूणाईचे वास्तव या चित्रपटातून दाखवण्यात आले आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये शाहिद आणि आलिया हे त्यांच्या आत्तापर्यंतच्या भूमिकांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या अवतारात दिसतात. शाहिदने चित्रपटात टॉमी सिंग या व्यसनाधीन रॉकस्टारची आणि आलिया भटने एका बिहारी मुलीची भूमिका साकारली आहे. ड्रग्जच्या पूर्णपणे आहरी गेलेला शाहिदचा टॉमी सिंग प्रेक्षकांचे निश्चितच लक्ष वेधून घेतो. तर आत्तापर्यंत रोमँटिक आणि ग्लॅमरस भूमिका साकारणाऱ्या आलियाचा या चित्रपटातील अवतार अनेकांना थक्क करणारा आहे. शेतात काम करताना उन्हात रापलेला आलियाचा चेहरा, तिचे बिहारी भाषेतील संवाद प्रेक्षकांसाठी सर्वस्वी नवा अनुभव आहे. याशिवाय, करिना कपूरने साकारलेली डॉ. शिवानी गुप्ताची भूमिकाही प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारी आहे. एकुणच चित्रपटाचा ट्रेलर प्रभावी असून त्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा आणखी ताणली जाणार आहे. अभिषेक चौबे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक असून, १७ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2016 8:58 am

Web Title: udta punjab trailer watch alia bhatt shahid kapoor in a never seen avatar
Next Stories
1 राज कपूर जीवनगौरव पुरस्कार जितेंद्र यांना जाहीर
2 ‘जे घडलेच नाही त्याबद्दल काय बोलायचे’; पत्रकारांच्या प्रश्नांना शाहिद -करिनाची भन्नाट उत्तरे
3 होय मी बाप होणार आहे; शाहिद कपूरची गोड कबुली
Just Now!
X