News Flash

अल्ट्रा मीडिया आणि एंटरटेनमेन्ट प्रा. लि. भारतात प्रमोट करणार मराठी थ्रीडी सिनेमे

पूर्वी अल्ट्रा विडिओ किंवा अल्ट्रा डिस्ट्रीब्युटर नावाने ओळखले जाणारे अल्ट्रा मीडिया आणि एंटरटेनमेन्ट प्रा.लि. आता भारतात मराठी थ्रीडी सिनेमे प्रमोट करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

| April 18, 2015 01:27 am

पूर्वी अल्ट्रा विडिओ किंवा अल्ट्रा डिस्ट्रीब्युटर नावाने ओळखले जाणारे अल्ट्रा मीडिया आणि एंटरटेनमेन्ट प्रा.लि. आता भारतात मराठी थ्रीडी सिनेमे प्रमोट करण्यासाठी सज्ज झाले आहेत. अल्ट्रा मिडिया आणि एंटरटेनमेन्ट प्रा.लि.ची एक शाखा असणारी अल्ट्रा स्टुडिओज आणि डिजिटल आपल्या अत्याधुनिक स्टुडिओजच्या माध्यमातून मराठी चित्रपट निर्मात्यांना थ्रीडी सिनेमे बनविण्याचे जागतिक दर्जाचे सर्वसमावेशक तोडगे अनुदानित तत्वावर देणार आहेत.
या शाखेअंतर्गत प्रत्येक थ्रीडी फिल्म मेकरला त्याच्या अभिनव अपेक्षांनुसार खास बनवण्यात आलेलं सोल्युशन्स पॅकेज पुरवण्यात येईल. उपक्रमामागचा मूळ उद्देश असा की, या फिल्म मेकर्सना भारतातच जागतिक दर्जाचं विशेष, हायटेक थ्रीडी कॉण्टेण्ट आऊटपुट उपलब्ध व्हावं.

या शाखे अंतर्गत पुरवण्यात येणाऱ्या विविध सेवा पुढीलप्रमाणेः

·    स्टुडिओत लंइन हाऊस स्थानिक सॉफ्टवेअर वापरून टूडीतून थ्रीडी स्टिरिओस्कोपिक रूपांतरण करणं.
·    थ्रीडी फिल्म्ससाठी व्हीएफएक्स
·    अॅनालिटिकल क्वालिटी मेजरमेण्ट आणि एन्हान्समेण्ट सॉफ्टवेअर अॅप्लिकेशन
·    विशेष थ्रीडी डायरेक्ट कॅमेरे भाडे तत्त्वावर पुरवणं
·    आवश्यकतेप्रमाणे बनवण्यात आलेल्या कॅमेरा रिग्ज भाडे तत्त्वावर पुरवणं
·    चित्रपटाचं दिग्दर्शन आणि सहाय्यतेसाठी उत्तम तांत्रिकज्ञान असणारे स्टिरिओग्राफर्स

गेल्या काही वर्षांमध्ये मराठी चित्रपटसृष्टीमध्ये काही थ्रीडी सिनेमे बनू लागले आहेत पण त्यांची वारंवारता फारच कमी आहे. पहिला मराठी थ्रीडी चित्रपट होता ‘आई मला मारू नको’ जो सत्य प्रकाश मंगतन यांनी २०१२ साली बनवला होता. त्यापाठोपाठ आला २०१३मध्ये प्रदर्शित झालेला ‘झपाटलेला२’ ज्यांची निर्मिती महेश कोठारे यांनी केली होती. २०१४मध्ये बनलेला ‘ध्यास’ हा मराठीतला शेवटचा टूडी ते थ्रीडी स्टिरिओस्कोपिक सिनेमा होता, जो भारतात प्रदर्शित झाला.
मुंबईच्या मध्यवर्ती भागात असलेला हा हायटेक स्टुडिओ आपल्या स्थानिक सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विविधप्रकारच्या सेवा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरवतो ते पुढीलप्रमाणेः

·    डबिंग, साऊण्ड रेकॉर्डिंग, मिक्सिंग, एडिटिंग, व्हीएफएक्सआणिइतरसंबंधितसुविधा
·    डिजिटल इंटरमिडिएट आणि कलर ग्रेडिंग
·    वेगवेगळ्या फॉर्मेट्समधलं डिजिटायझेशन
·    कॉण्टेण्ट स्केल अपः एसडी ते फोर के फॉर्मेट्स
·    जतन/संवर्धनः वेगवेगळ्या फॉर्मेट्समधलं फ्रेम बाय फ्रेमजतन (रिस्टोरेशन)
·    ब्लॅक अॅण्ड व्हाइट मधून रंगीत
·    एडिटिंग, ऑडिओ आणि साऊण्ड इंजिनिअरिंग

अल्ट्रा मीडिया आणि एण्टरटेन्मेण्ट प्रा.लि.ने स्वतःकडेच बनवलेले आणि वितरित केलेले बहुश्रुत मराठी सिनेमे पुढीलप्रमाणेः
गोंद्या मारतंय तंगडं
लोणावळा बायपास
होऊन जाऊ दे
सालीने केला घोटाळा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2015 1:27 am

Web Title: ultra media entertainment pvt ltd to promote 3d marathi films in india
टॅग : Marathi Movies
Next Stories
1 दगडू प्राजक्ताची ‘अधुरी प्रेमकहाणी’ नव्याने फुलणार
2 मॉरिशियस येथील “झाकरी” नृत्यप्रकार रुपेरी पडद्यावर झळकणार!!
3 ऑस्कर लायब्ररीत ‘बेबी’!
Just Now!
X