News Flash

प्रिया बापट आणि उमेश कामतला करोनाची लागण

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती

(photo credit : instagram @priyabapat @umesh.kamat)

करोना अनलॉकनंतर हळूहळू सगळ्या गोष्टी स्थिरावताना दिसत असताना. पुन्हा एकदा करोनाचं संकट आपल्या समोर उभ राहिलं आहे. याचा परिणाम चित्रपटसृष्टीवर देखील होतं आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांना करोनाची लागण झाल्याची बातमी समोर येत आहे. त्यातच आता मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणजेच उमेश कामत आणि प्रिया बापट यांना दोघांना करोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे.

प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर ही बातमी सगळ्यांसोबत शेअर केली. “दुर्देवाने उमेश आणि माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आम्ही दोघेही घरातच विलगीकरणात आहोत. डॉक्टरांनी दिलेली सगळी औषध घेतोय आणि त्यांनी सांगितलेल्या सर्व सुचनांचे पालन करत आहोत. गेल्या आठवड्याभरात आम्हाला जे कोणी भेटले त्यांनी करोनाची चाचणी करून घ्या,” अशी पोस्ट प्रियाने केली होती.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Umesh Kamat (@umesh.kamat)

उमेश लवकरच आपल्या सगळ्यांना ‘ताठ कणा’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर भेटायला येणार आहे. ‘ताठ कणा’ हा चित्रपट डॉ. प्रेमानंद रामाणी यांच्या जीवनावर आधारित आहे. उमेश या चित्रपटात त्यांचीच भूमिका साकारणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2021 4:46 pm

Web Title: umesh kamat and priya bapat tested corona positive dcp 98
Next Stories
1 सुहानाच्या बॉयफ्रेंडने जर तिला किस केले तर…,शाहरूखचा खुलासा
2 नागा चैतन्याची बॉलिवूडमध्ये एण्ट्री, आमिरसोबत ‘लाल सिंह चड्ढा’मध्ये झळकणार!
3 ‘डॉक्टर डॉन’मध्ये विक्रांत आणि मोनिकाचा साखरपुडा होणार का?
Just Now!
X