12 December 2018

News Flash

उमेश- तेजश्री म्हणताहेत ‘असेही एकदा व्हावे’

नात्यांच्या आशावादी पैलूंवर भाष्य करणारा चित्रपट

तेजश्री प्रधान, उमेश कामत

माणसाच्या जीवनात येणाऱ्या विविध नात्यांच्या गुंतागुंतीतून त्याचे आयुष्य ठरत असते. प्रत्येक नात्यातील कंगोरे आणि जबाबदारी पेलताना ‘असेही एकदा व्हावे’ या आशेवर प्रत्येक व्यक्ती मार्गक्रमण करत असतो. नात्याच्या याच आशावादी पैलूंवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘झेलू एंटरटेन्मेंट’ निर्मित आणि सुश्रुत भागवत दिग्दर्शित या चित्रपटाचे नाव ‘असेही एकदा व्हावे’ आहे.

या चित्रपटात उमेश कामत आणि तेजश्री प्रधान यांच्या मुख्य भूमिका असून नुकताच त्याचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. विशेष म्हणजे यात तेजश्री आर.जे.च्या भूमिकेत झळकरणार असून तिचा लूक चाहत्यांना सुखद धक्का देणारा ठरत आहे. दोघांना वाटणारी प्रेमाची अनाहूत जाणीव आणि नाते स्वीकारण्यापूर्वीचे दडपण या ट्रेलरमध्ये दिसून येते. चित्रपटात या दोघांसोबतच शर्वाणी पिल्लई, डॉ. निखिल राजेशिर्के, चिराग पाटील, कविता लाड आणि अजित भुरे या कलाकारांच्याही भूमिका आहेत.

वाचा : शेतकरी मोर्चावर आमिर म्हणतो..

यातील ‘किती बोलतो आपण’ आणि ‘सावरे रंग मे’ ही दोन गाणीसुद्धा नुकतीच प्रदर्शित झाली. या गाण्यांना अवधूत गुप्तेने संगीतबद्ध केले आहे. अवधूत गुप्तेने या चित्रपटात एक रोमॅण्टिक गाणं, एक गझल तर एक शास्त्रीय ठुमरी संगीतबद्ध केली आहे. प्रेमाची निखळ कथा मांडणाऱ्या या चित्रपटाची मधुकर रहाणे यांनी निर्मिती केली असून येत्या ६ एप्रिल रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

First Published on March 14, 2018 5:25 pm

Web Title: umesh kamat and tejashree pradhan marathi movie asehi ekda vhave trailer released