News Flash

उमेश आणि प्रिया म्हणतात, ‘आणि काय हवं!’

प्रियाला अशा प्रकारे त्रास देताना खूप मजा येते. मी सेटवर बऱ्याच गोष्टींमध्ये जास्त सहभागी नसतो, मात्र प्रियाला त्रास देण्यात सर्वात पुढे असतो.

मराठी चित्रपटसृष्टीतील ‘चॉकलेट बॉय’ असे बिरुद मिळविलेला उमेश कामत आणि त्याची  अभिनेत्री पत्नी प्रिया बापट ही लोकप्रिय जोडी दीर्घ काळानंतर एम. एस. एक्स्क्लुझिव्हच्या ‘आणि काय हवं’ या वेबसीरिजच्या निमित्ताने पडद्यावर पुन्हा एकत्र काम करत आहे. या वेबसीरिजच्या चित्रीकरणादरम्यान सेटवर उमेशने प्रियाला वायफळ तरीही तितकीच गमतीशीर बडबड करून वैताग आणला होता. त्यांच्या या गमतीमध्ये ‘आणि काय हवं’चे दिग्दर्शक वरुण नार्वेकरही सहभागी होते.

प्रियाला अशा प्रकारे त्रास देताना खूप मजा येते. मी सेटवर बऱ्याच गोष्टींमध्ये जास्त सहभागी नसतो, मात्र प्रियाला त्रास देण्यात सर्वात पुढे असतो. ‘आणि काय हवं’च्या सेटवर मी आणि आमचे दिग्दर्शक वरुण नार्वेकर आम्ही दोघांनीही प्रियाला सळो की पळो करून सोडतो, असे उमेश म्हणाला. प्रेक्षकांमध्येही उमेश आणि प्रिया ही जोडी लोकप्रिय आहे. या दोघांचे एकमेकांबद्दल असणारे प्रेम नेहमीच त्यांच्या डोळ्यांतून व्यक्त होते. ‘आणि काय हवं’ च्या निमित्ताने सात वर्षांनंतर ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. लग्नानंतर पहिल्यांदा घडणाऱ्या सर्व गोष्टी म्हणजेच पहिला सण, पहिले भांडण, पहिले घर, पहिली गाडी आणि इतर अनेक प्रसंग हलक्याफुलक्या गोष्टीतून या वेबसीरिजमधून उलगडणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 11, 2019 1:34 am

Web Title: umesh kamat priya bapat aani kay hava mpg 94
Next Stories
1 Saaho Trailer : फुल ऑन अ‍ॅक्शनला प्रभास-श्रद्धाच्या रोमान्सचा ‘तडका’
2 Rakshabandhan 2019 : बॉलिवूडमधील बहीण- भावाच्या ‘या’ जोड्या माहितीयेत का?
3 …म्हणून २०१९मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘उरी’ला २०१८ चे राष्ट्रीय पुरस्कार
Just Now!
X