मराठी चित्रपटसृष्टीतील ‘चॉकलेट बॉय’ असे बिरुद मिळविलेला उमेश कामत आणि त्याची अभिनेत्री पत्नी प्रिया बापट ही लोकप्रिय जोडी एम. एस. एक्स्क्लुझिव्हच्या ‘’आणि काय हवं?’च्या’ या वेबसीरिजच्या  निमित्ताने पडद्यावर एकत्र झळकले होते. या सीरिजने प्रेक्षकांची तुफान लोकप्रियता मिळविली होती. त्यामुळे आता या सीरिजचा सिझन २ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. विशेष म्हणजे पहिल्या सीरिजप्रमाणेच एम एक्स प्लेअरवर हा दुसरा सीझनही लोकप्रिय ठरत आहे. प्रेक्षकांच्या मनात हळुवार उतरणारी ही कथा दिग्दर्शक वरून नार्वेकर यांनी उलगडली आहे.

भावनिक नात्याच्या गोफ विणणाऱ्या या दुसऱ्या पर्वात तंत्रज्ञानाचा उत्तमरित्या वापर करण्यात आला आहे. अगदी जुई आणि साकेतच्या घरापासून ते सीरिजमधील प्रत्येक भाग प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा यासाठी कॅमेराचा उत्तम वापर करण्यात आला आहे. त्यामुळे पहिल्या सिझनपेक्षा या सिझनमधून जुई आणि साकेतची कथा क्रिएटिव्हरित्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी यासाठी दिग्दर्शक वरुण नार्वेकर यांनी प्रयत्न केला आहे.

पाहा : जुई आणि साकेत पुन्हा म्हणत आहेत ‘..आणि काय हवं?’

सीरिजच्या पहिल्या भागात जुई आणि साकेत यांच्यात खुलणारं प्रेम दाखविण्यात आलं होतं. तर दुसऱ्या सिझनमध्ये त्यांच्या लग्नाला ३ वर्ष झाली असून या नात्यातील गोडवा, रुसवे-फुगवे यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

या सीरिजमध्ये प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या व्यतिरिक्त क्षिती जोग, उदय नेने, विक्रम पटवर्धन, प्रियदर्शन जाधव, धीरेश जोशी, उदय सबनीस, विना फडके,ऐश्वर्या अहेर, दिप्ती महादेव, अरुण पटवर्धन, चैताली माझगावकर ही कलाकार मंडळीही झळकली आहेत.