26 September 2020

News Flash

दीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट

स्मृती इराणींनी असा फोटो शेअर केला आहे ज्यामुळे तुम्हाला हसू आवरणार नाही.

सध्या बॉलिवूडचं सर्वाधिक चर्चेत असेलली जोडी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांचा विवाह बुधवारी कुटुंबातील मोजक्यात लोकांच्या उपस्थितीत इटलीतील लेक कोमो इथल्या नयनरम्य व्हिलामध्ये पार पडला. मात्र, या विवाह सोहळ्याची छायाचित्रे अद्याप कोणालाही उपलब्ध होऊ शकलेली नाहीत. त्यांच्या लग्नाची छायाचित्रे पाहण्याची तरुणांसह त्यांच्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. तशीच उत्सुकता केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनाही आहे. त्यामुळे त्यांनी या उत्सुकतेवर आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक मजेशीर पोस्ट केली आहे.

स्मृती इराणींनी असा फोटो शेअर केला आहे ज्यामुळे तुम्हाला हसू आवरणार नाही. यामध्ये एका पुरुषाचा सांगाडा बाकड्यावर बसलेला आहे. त्याखाली इराणींनी कॅप्शन लिहीले की, दीपिका आणि रणवीरच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी तुम्ही खूप काळ वाट पाहता तेव्हा….

इराणींच्या या पोस्टनंतर त्यावर अनेक चांगल्या कमेंटही पहायला मिळल्या. काही युजर्सला आनंद वाटला की केवळ तेच नव्हे तर केंद्रीय मंत्री स्मृती इराणीही दीपवीरच्या लग्नाच्या फोटोंची वाट पाहत आहेत.

दीपिका आणि रणवीर यांचे लग्न पार पडल्याची खबर एव्हाना सर्वांपर्यंत पोहोचली मात्र, लग्नाचा एकही फोटो अद्याप या जोडीने माध्यमांपर्यंत पोहोचू दिलेला नाही. त्यामुळे यामागे त्यांची काय योजना आहे हे गुलदस्त्यात आहे. मात्र, त्यामुळे पहिल्यांदा आपल्यालाच फोटो पहायचाय अशी इच्छा असणाऱ्या त्यांच्या चाहत्यांची अस्वस्थता वाढतच चालली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2018 5:03 am

Web Title: union minister smriti irani too is longing for the deepika ranveer wedding pictures to be officially released
Next Stories
1 श्री रामायण एक्स्प्रेसला हिरवा कंदील; १६ दिवसांत ऐतिहासिक प्रवास अनुभवण्याची संधी
2 मोदी- पेन्स यांच्यात व्यापक चर्चा
3 आसिया अंद्राबीवर एनआयएचे आरोपपत्र
Just Now!
X