News Flash

‘व्हॅनिला, स्ट्रॅाबेरी अँण्ड चॉकलेट’च्या कलाकारांची अनोखी भाऊबीज

बहीण-भावाचं नातं म्हणजे ‘तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना’ असंच असतं.

भावा-बहीणीचं नातं हे थोडं खासच असतं. नात्यातील रुसवे-फुगवे आणि प्रेम यांनी परिपूर्ण असलेलं हे नातं म्हणजे ‘तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना’ असंच असतं. या नात्याचा गोडवा रक्षाबंधन आणि भाऊबीजने द्विगुणित होतो. भाऊबीजेचा हा दिवस काही दिवसांवर येऊन ठेपला असून ‘व्हॅनिला, स्ट्रॅाबेरी अँण्ड चॉकलेट’ या आगामी चित्रपटातील कलाकरांनी एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने ही भाऊबीज आधीच सेलिब्रेट केला.

‘व्हॅनिला, स्ट्रॅाबेरी अँण्ड चॉकलेट’ चित्रपटाची नायिका जानकी पाठकने दरवर्षी प्रमाणे यंदा ही तिचा लाडका कुत्रा कॅस्पर याच्यासोबत तिची भाऊबीज साजरी करणार आहे. एक भाऊ बहिणीसाठी जे काही करतो ते सगळचं कॅस्पर जानकीसाठी करतो. कोणत्याही प्रसंगात तो तिच्यासोबत असतो. त्यामुळे म्हणूनच जानकी दरवर्षी कॅस्परसोबत आपली भाऊबीज साजरी करते. ही भाऊबीज साजरी करताना ती कॅस्परला ओवाळणार आहे, त्याला त्याच्या आवडीचे पदार्थ खाऊ घालणार आहे, इतकंच नाही तर तिने त्याच्यासाठी एक छानस गिफ्ट सुद्धा आणलं आहे.

तिचं हेच प्राणीप्रेम आपल्याला लवकरच ‘व्हॅनिला, स्ट्रॅाबेरी अँण्ड चॉकलेट’ चित्रपटातूनही पहायला मिळणर आहे. ‘व्हॅनिला, स्ट्रॅाबेरी अँण्ड चॉकलेट’ हा चित्रपट १६ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2018 10:01 am

Web Title: unique brother law artists marathi movie vanilla strawberries and chocolate
Next Stories
1 ‘बिग बॉस’मुळे माझं आर्थिक नुकसान- अनुप जलोटा
2 रणवीरच्या घरी लगीनघाई, पार पडला हळदी समारंभ
3 संजय लीला भन्साळी ‘करण-अर्जुन’ला एकत्र आणणार ?
Just Now!
X