08 March 2021

News Flash

छोट्या पडद्यावरचा रोमॅण्टिक हिरो; अभिनय ते रिलेशनशिप्स जाणून घ्या करणबद्दल

बर्थडे स्पेशल...

टेलिव्हिनवरील लोकप्रिय अभिनेता अशी ओळख असलेल्या करण सिंग ग्रोवरचा आज 39 वा वाढदिवस आहे. बिपाशा बासूसोबत करण मालदीवमध्ये बर्थडे साजरा करतोय. अभिनयासोबतच करण हॅण्डसम लूक, नात्यांमधले वाद, टॅटू, फिटनेस अशा अनेक गोष्टींमुळे कायम चर्चेत राहिला. करणच्या वाढदिवसानिमित्त आपण करणचे सिक्रेटस् जाणुन घेणार आहोत.

करणची टेलिव्हिजनवरील एन्ट्री
करण सिंग ग्रोवरने हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण पूर्ण केलंय. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी त्याने शेरटन हॉटेलमध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केलंय.त्यानंतर करण मॉडलिंगकडे वळाला. करणला मोस्ट पॉप्युलर मॉडलचा अ‍ॅवॉर्डही मिळालाय. एकता कपूरच्या ‘कितनी मस्त हे जिंदगी’ या मालिकेतून करणने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by karan singh grover (@iamksgofficial)

करणमध्ये दडलेला कलाकार
अभिनयासोबतच करणला स्केचिंगची आवड आहे. मोकळ्या वेळेत करण स्केचिंग करण पसंत करतो. करणमधील ही कला सगळ्यांना माहित नाही. बिपाशा बासू मात्र कायम करणचे स्केच सोशल मीडियावर शेअर करत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by karan singh grover (@iamksgofficial)

फिट है तो हिट है
करण सिंग ग्रोवर त्याच्या फिटनेससाठीदेखील ओळखला जातो. करणच्या फिट बॉडीवर अनेकजण फिदा आहेत. यासाठी करण खुप मेहनतही घेताना दिसतो. दररोज न चुकता व्यायाम करण आणि योग्य डाएट याबाबतीत करण अजिबात दुर्लक्ष करत नाही. वेगवेगळ्या प्रकारेचे व्यायाम करण त्याला पसंत आहे. आठवड्यातीन तीन दिवस करण योगा करतो. सुदृढ शरिरासोबतच  मनही सुदृढ हवं यासाठी करण मेडिटेशन करतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by karan singh grover (@iamksgofficial)


फिट बॉडी आणि टॅटू
करणला टॅटूची आवड आहे. करणकडे पाहताच हे लक्षात येत. त्याच्या शरीरावर जवळपास सहा ते सात टॅटू आहेत. करणच्या मस्क्यूलर बॉडीवर हे टॅटू शोभून दिसतात. कॉलेजमध्ये असतानाच करणने त्याच्या दंडावर पहिला टॅटू काढला होता. तर करणच्या हातावरही अनेक टॅटू आहेत. एका टॅटूत शांती, प्रेम, आनंद आणि यश असं लिहलेलं आहे.

हेट क्रिकेट, हेट सिगरेट
करण सिंग ग्रोवर पार्टी बॉय असला तरी त्याला सिगरेटचा प्रचंड तिरस्कार आहे. भारतात क्रिकेटप्रेमी लोक असले तरी करणला मात्र बास्केटबॉल खेळ प्रचंड आव़डतो. मालिकेच्या सेटवरही करण अनेकदा बास्केटबॉल खेळणं पसंत करतो.

करणच्या नात्यांचा गुंता
करण सिंग ग्रोवर सगळ्यात जास्त चर्चेत राहिला ते म्हणजे त्याने केलेल्या तीन लग्नांमुळे. दोन लग्न मोडल्यानंतर करणने अभिनेत्री बिपाशा बासूसोबत लग्नगाठ बांधली. करणने अभिनेत्री श्रद्धा निगम हिच्यासोबत पहिलं लग्न केलं मात्र हे लग्न फार काळ टिकलं नाही. लग्नानंतर अवघ्या 10 महिन्यातच दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर करणचं नाव कोरिओग्राफर निकोल अलव्हारसे आणि अभिनेत्री कविता कौशिकसोबत जोडलं गेलं.

प्रेक्षकांची फेव्हरेट जोडी

कालांतराने अभिनेत्री जेनिफर विंगेट सोबत करणचं सूत जुळलं. ‘दिल मिल गये’ या मालिकेतून करण आणि जेनिफरची जोडी प्रेक्षकांना पाहायाल मिळाली. त्यांच्या जोडीला प्रेक्षकांनीदेखील भरभरुन प्रेम दिलं. याच मालिकेदरम्यान करण जेनिफर एकत्र आले. लग्नाच्या 3 वर्षांनंतर करण आणि जेनिफर विभक्त झाले. करण जेनिफरच्या घटस्फोटामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.

बिपाशा बासूसोबत करणने पहिला सिनेमा केला. यावेळी दोघांच्याही अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. 2016 मध्ये करणने बिपाशासोबत तिसरं लग्न केलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by karan singh grover (@iamksgofficial)

विशेष म्हणजे जेनिफर आणि बिपाशा या दोघींनादेखील करणच्या घरच्यांनी स्विकारलं नव्हतं. तर बिपाशा आणि करणच्या लग्नालादेखील दोघांच्या कुटुंबियांचा विरोध होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2021 12:58 pm

Web Title: unknown facts about karan sing grovers relationships and his life kpw 89
Next Stories
1 कतरिनाची बहीण लवकरच बॉलिवूडमध्ये; चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित
2 शाल्व-शुभांगी गोखलेंची ‘पावरी’; शेअर केला मजेशीर व्हिडीओ
3 विरुष्काच्या घरी नाही एकही नोकर?; ‘ही’ व्यक्ती करते सगळं काम
Just Now!
X