18 September 2020

News Flash

Happy Birthday Lata Mangeshkar:जाणून घ्या, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याविषयी ‘या’ गोष्टी

त्यांनी आतापर्यंत २५ हजारांहून अधिक गाणी गायली आहेत.

ज्येष्ठ पार्श्वगायिका आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर

आपल्या आवाजाच्या जादूने देशाला मंत्रमुग्ध करणाऱ्या लतादीदी अर्थात लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस. लतादीदींनी आपल्या सुमधूर आवाजाने देशाला मंत्रमुग्ध केलं. लतादीदी गेल्या सात दशकांपासून त्या आपल्या मधूर आवाजाने रसिकांची मनं जिंकत आहेत. २८ सप्टेंबर १९२९ मध्ये इंदौर येथे लता मंगेशकर यांचा जन्म झाला. त्यांनी आतापर्यंत २५ हजारांहून अधिक गाणी गायली आहेत.

लता मंगेशकर यांना त्यांच्या वडीलांकडून पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून गाण्याचा वारसा मिळाला. लता, आशा, उषा, मीना, आणि हृदयनाथ या मंगेशकर भावंडांमध्ये लतादीदी सर्वात मोठ्या. लता मंगेशकर यांचे मूळ नाव हेमा असे ठेवण्यात आले होते. पण काही वर्षांनंतर दिनानाथ यांच्या नाटकातील ‘लतिका’ या पात्राच्या नावावरुन त्यांनी लता असे नाव ठेवले.

वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षापासून त्यांनी संगीताचे शिक्षण घेण्यास सुरूवात केली. त्या अनेक वर्षे रंगभूमीवरही कार्यरत होत्या. १९४२ मध्ये लता मंगेशकर १३ वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यानंतर १९४५ मध्ये दीदी आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत मुंबईत आल्या. त्यांनी उस्ताद अमानत अली खान यांच्याकडून शास्त्रीय गायनाचे धडे गिरवले. त्यानंतर १९४६ मध्ये ‘आपकी सेवा में’ या सिनेमात ‘पा लागूं कर जोरी’ हे गाणे गायले.

त्यानंतर संगीत दिग्दर्शक गुलाम हैदर यांनी ‘मजबूर’ या सिनेमातील ‘दिल मेरा तोडा, कहीं का ना छोडा’ हे गाणे गायला सांगितले. हे गाणे बऱ्यापैकी लोकप्रिय झाले. दीदींनी एका मुलाखतीत गुलाम हैदर यांना आपले ‘गॉडफादर’ असल्याचे म्हटले होते. विशेष म्हणजे दीदींनी ‘पहिली मंगळागौर’ या चित्रपटातही काम केलं होता.

आजपर्यंतच्या कारकीर्दीत लतादीदींनी ७ दशकांमध्ये १००० हून अधिक हिंदी चित्रपटांना आपला आवाज दिला आहे. तर ३६ हून अधिक भाषांमध्ये पार्श्वगायन केले आहे. २००१ मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. याशिवाय, १९६९ मध्ये ‘पद्मभूषण’, १९८९ मध्ये ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ आणि १९९९ मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2018 8:34 am

Web Title: unknown facts about singer lata mangeshkar on her birthday special
Next Stories
1 Happy Birthday Ranbir Kapoor : बॉलिवूडचा ‘कॅसिनोव्हा’ रणबीरने केलेय या अभिनेत्रींना डेट
2 ही ठरली केबीसीच्या १० व्या भागाची विजेती; आता तयारी ७ कोटींसाठी
3 तनुश्री दत्ता- नाना पाटेकर यांच्यात नेमकं काय घडलं? वाचा प्रत्यक्षदर्शीचा खुलासा
Just Now!
X