सैफ अली खान आणि करिना कपूरचा मुलगा तैमुरचे स्टारडम हे कोणत्याही सुपरस्टारपेक्षा कमी नाही. त्याचे कोणत्याही अंदाजातील फोटो अतिशय कमी वेळात सोशल मीडियावर व्हायरल होतात, इतकेच नाही तर त्याची चर्चाही होते. त्यामुळे त्याचा चाहतावर्गही दिवसेंदिवस वाढत आहे. तैमुरविषयी प्रत्येक गोष्ट समजावी यासाठी त्याचे चाहते प्रयत्न करत असतात. नुकताच करिना कपूर, सैफ आणि तैमुर यांचे मालदिव येथील फोटो समोर आले आहेत. हे तिघेही सुटीसाठी याठिकाणी गेले असून छोट्यासा तैमूर त्याची आई करिनासोबत अतिशय गोंडस दिसत आहे. तैमुरचा २० डिसेंबर रोजी वाढदिवस असून त्या दिवशी तो २ वर्षांचा होईल. आपल्या लाडक्या मुलाचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी हे कुटुंब मालदीवला गेल्याचे समजते.

या फोटोमध्ये तैमुरने हिरव्या रंगाची पँट आणि लाल रंगाचे बूट घातल्याचे दिसत आहे. तर करिना सिल्व्हर रंगाच्या हटके अशा वनपीसमध्ये दिसत आहे. दुसऱ्या फोटोत तो सैफसोबत एका सायकलच्या मागच्या बास्केटमध्ये बसलेला दिसत आहे. अभिनेते आणि अभेनेत्री यांना बऱ्याचदा स्वत:चा वेळ मिळत नाही. तसेच देशातही त्यांना मोकळेपणाने फिरता येत नाही. त्यांच्या सार्वजनिक जीवनावर बंधने असल्याने ते कुटुंबासोबत वेळ घालविण्यासाठी मालदिवसारख्या ठिकाणांची निवड करतात. सैफही या फोटोत अतिशय देखणा दिसत आहे. लाल रंगाचा शर्ट आणि पांढऱ्या रंगाची हाफ पँट घालून तो तैमुरला तीनचाकी सायकलवरुन सफर घडविण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. आई-वडिलांसोबतच्या या वेळेचा तैमुर नक्कीच आनंद घेत असेल यात शंका नाही. तर आणखी एका फोटोत करिना आणि सैफ डायनिंग टेबलवर जेवताना दिसत आहेत. यात करिना सैफला जेवायला वाढत आहे.