30 November 2020

News Flash

मोहन जोशींचा ‘रफ अँड टफ’ लूक

या भूमिकेला न्याय देण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत

आपल्या दमदार अभिनयाने अवघी मराठी सिनेसृष्टी गाजवणारे अभिनेते मोहन जोशी लवकरच ‘सिनिअर सिटीझन’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटात त्यांनी अभय देशपांडे या निवृत्त लष्कर अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. अभय देशपांडे निवृत्त लष्कर अधिकारी असल्यामुळे त्यांच्यात निडरपणा आणि साहस ओघाओघाने आलेलंच आहे. त्यामुळे या भूमिकेला न्याय देण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. त्यातच या चित्रपटामध्ये अॅक्शन सीनचा मोठ्या प्रमाणात भरणा करण्यात आला असून मोहन जोशी रफ अॅण्ड टफ लूकमध्ये दिसणार आहे.

ही भूमिका खरी वाटावी, म्हणून त्यांनी जिममध्ये जाऊन व्यायाम केला, बॉक्सिंगचा सराव केला, त्यांच्या डाएटमध्येही बदल केला. देहबोली, बोलण्या-चालण्यातील रुबाबरदारपणा, फिटनेस या सगळ्या गोष्टींवर त्यांनी विशेष लक्ष दिलं.

”एखादा लष्कर अधिकारी निवृत्त झाल्यानंतरही त्याची लष्करातील जीवनशैलीच जगत असतो. खरंतर ही शिस्त त्याच्या अंगात भिनलेली असते. त्यामुळे हा निडरपणा माझ्यात आणण्याचा प्रयत्न केला. मुळात जी भूमिका मी स्वीकारतो, त्या भूमिकेचा मी अभ्यास करतो. या भूमिकेसाठी कोणते गुण आवश्यक आहेत, ते मी माझ्यात उतरवण्याचा प्रयत्न करतो. कारण एक कलाकार म्हणून ते खूप गरजेचे आहे. त्यामुळे अभय देशपांडे साकारताना मी फिटनेसकडे जास्त लक्ष दिले. ऊर्जा पातळी वाढवण्यासाठी मी विशेष प्रयत्न केले. या चित्रपटात मला बुलेट चालवायची होती आणि बुलेट चालवणे, माझी पॅशन आहे. त्यामुळे मी खूप खुश होतो. याच खुशीत एकदा एक सीन सुरु असताना, मी बुलेट घेऊन सुसाट सुटलो. काही अंतर गेल्यावर माझ्या लक्षात आले, की इतक्या वेगाने ती मला चालवायची नव्हती. मग परत रिटेक घेतला,” असं मोहन जोशी यांनी सांगितलं.

या चित्रपटात मोहन जोशी यांच्या व्यतिरिक्त स्मिता जयकर, सुयोग गोऱ्हे, अमृता पवार, स्नेहा चव्हाण, श्रुती बोराडीया, किरण तांबे, अमोल जाधव, गौरीश शिपूरकर, हर्षल पवार, आशिष पवार, कमलेश सावंत या चित्रपटात दिसणार आहेत. माधुरी नागानंद आणि विजयकुमार नारंग निर्मित ‘सिनियर सिटीझन’ या चित्रपटात क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून राजू सावला यांनी काम पाहिले आहे तर प्रमोद सुरेश मोहिते चित्रपटाचे एक्झिक्टिव्ह प्रोड्युसर आहेत. हा चित्रपट येत्या १३ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2019 3:11 pm

Web Title: up coming marathi movie senior citizen actor mohan joshi new look ssj 93
Next Stories
1 टेलर स्विफ्टने केली कमाल; मोडला मायकल जॅक्सनचा विक्रम
2 हार्दिक पांड्या रिलेशनमध्ये, ‘या’ अभिनेत्रीला करतोय डेट
3 ‘दबंग ३’मध्ये झळकणार मांजरेकर कुटुंब
Just Now!
X