25 February 2021

News Flash

आता मुंबईत ‘तांडव’ होणार! उत्तर प्रदेश पोलीस चौकशीसाठी मुंबईत

दिग्दर्शकांसह निर्मात्यांची होणार चौकशी

दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्या ‘तांडव’ सीरिजचा वाद अद्यापही कायम आहे. हिंदू देवदेवतांचा अपमान केल्याप्रकरणी देशभरातून या सीरिजचा विरोध केला जात आहे. तर दुसरीकडे अनेक ठिकाणी या सीरिजविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यातच आता या सीरिजपुढील अडचणीत वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशचे पोलीस याप्रकरणी चौकशी करण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहे, असं लाइव्ह हिंदुस्तानच्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

‘तांडव’ या सीरिजविरोधात जवळपास ६ शहरांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणी तांडवच्या मेकर्सची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेशचे पोलीस मुंबईत दाखल झाले आहेत. लखनौमधील हजरतगंज येथील चार पोलीस अधिकारी मुंबईत आले असून ते पुढील तपास करणार आहेत. दिग्दर्शक अली अब्बास जफर अॅमेझॉन हेड अपर्णा पुरोहित, निर्माते हिमांशु किशन मेहरा आणि लेखक गौरव सोलंकी यांची चौकशी केली जाणार आहे.

काय आहे प्रकरण?

‘तांडव’ सीरिजच्या पहिल्याच एपिसोडमध्ये हिंदू देव-देवतांची हेटाळणी करण्यात आली आहे. हा भाग पाहिल्यानंतर अनेकांनी ही सीरिज बॅन करण्याची मागणी केली. देशभरातून या सीरिजला विरोध होत असतानाच राजकीय वर्तुळातूनदेखील या सीरिजचा निषेध करण्यात आला. यात भाजपा नेते राम कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही विरोध दर्शविला.

वाचा : ‘तांडव’ शांत! वेब सीरिजमधील ‘ते’ वादग्रस्त दृश्य हटवणार

दिग्दर्शकांनी मागितली माफी

तांडवविरोधात नागरिकांचा संताप पाहिल्यानंतर दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी ट्विटरच्या माध्यमातून जाहीरपणे माफी मागितली आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचं त्यांनी सांगितलं. सोबतच आक्षेपार्ह दृश्य हटवण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2021 2:11 pm

Web Title: up police team reaches mumbai will question tandav makers report ssj 93
Next Stories
1 ‘चंद्र आहे साक्षीला’ मालिकेमध्ये आस्ताद काळेची एण्ट्री
2 बिग बींसोबतच्या ‘या’ चिमुकल्याला ओळखलंत का? आज आहे सुपरस्टार
3 ‘मी सुद्धा हिंदू आहे आणि या दृश्याने…’, तांडवच्या वादात स्वराची उडी
Just Now!
X