News Flash

Video : वर्षभरानंतर अंकुश चौधरी येतोय ‘ट्रिपल सीट’

या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच शिवानी सुर्वे आणि अंकुश चौधरी स्क्रीन शेअर करणार आहेत

महाराष्ट्राचा स्टाइल आयकॉन अर्थात अभिनेता अंकुश चौधरी लवकरच ‘ट्रिपल सीट’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तब्बल एका वर्षानंतर अंकुश पुन्हा पडद्यावर झळकणार असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अंकुशने ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याच्या चित्रपटाचा संपूर्ण प्रवास सांगितला.

या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच शिवानी सुर्वे आणि अंकुश चौधरी स्क्रीन शेअर करणार आहेत. त्यांच्यासोबत अभिनेत्री पल्लवी पाटीलदेखील झळकणार आहे. या चित्रपटाची निर्मिती नरेंद्र शांतीकुमार फिरोदिया यांनी केली आहे. तर कथा, पटकथा, संवाद आणि क्रिएटीव्ह दिग्दर्शन अॅड. अभिजित अरविंद दळवी यांनी केलं आहे. तगडी स्टारकास्ट, अनुभवी तंत्रज्ञ असलेला ‘ट्रिपल ”सीट’ हा मराठी चित्रपट येत्या २४ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2019 4:00 pm

Web Title: upcoming marathi movie ankush choudhary triple seat ssj 93
Next Stories
1 …म्हणून सोनाली कुलकर्णी वर्षभर ब्युटी पार्लरमध्ये गेली नाही
2 ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’तील शलाका आठवते?, पाहा तिचे आताचे फोटो
3 दिग्दर्शका विरोधात अभिनेत्रीची पोलिसात तक्रार
Just Now!
X