20 September 2020

News Flash

‘बॉईज २’ च्या यशानंतर ‘बॉईज ३’ ही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

पुन्हा एकदा प्रेक्षकांना बॉईजची धम्माल मस्ती पाहता येणार आहे.

ध्येर्या, ढुंग्या आणि कबीरची महाविद्यालयीन भानगड दाखवणाऱ्या, ‘बॉईज २’ ने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. इरॉस इंटरनॅशनल आणि एवरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत, अवधूत गुप्ते ह्यांच्या सहयोगाने सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रोडक्शनअंतर्गत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने केवळ १७ दिवसांमध्ये १६ कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. विशेष म्हणजे चित्रपटाच्या या यशानंतर आता ‘बॉईज ३’ देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतीक लाडची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या सक्सेस पार्टीचं काही दिवसापूर्वी आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी आगामी सक्सेस पार्टीत ‘बॉईज ३’ची घोषणा करण्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांना बॉईजची धम्माल मस्ती पाहता येणार आहे.

यादरम्यान, ‘बॉईज २’ चा दिग्दर्शक विशाल देवरुखकर यांनी ‘बॉईज २’ ला दिलेल्या उदंड प्रतिसादासाठी प्रेक्षकांचे आभार मानले. तसेच यापुढे ‘बॉईज ३’ साठी ऋषिकेश कोळीसोबत पुन्हा तयारीला लागणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2018 11:23 am

Web Title: upcoming marathi movie boys 3
Next Stories
1 ‘व्हॅनिला स्ट्रोबेरी अॅण्ड चॉकलेट’मध्ये रवी काळे यांचा नवा अंदाज
2 लगीनघाई, ‘या’ वर्षामध्ये प्रभास बोहल्यावर चढणार ?
3 Thugs of Hindostan : …अन् प्रभुदेवामुळे साकार झाली ‘सुरैय्या’ – कतरिना
Just Now!
X