प्रेम हा तरूणाईचा आवडता विषय…पण प्रेमाची व्याख्याच अलिकडे बदलल्याची दिसून येते. ख-या प्रेमाचा शोध घेणारी आणि प्रेम म्हणजे त्याग याचा शोध घेणारी अशीच एक रोमॅंटिक कथा ‘लव्ह फॅक्टर’ या सिनेमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. मुक्ताई फिल्म प्रोडक्शनच्या मुकुंद सातव यांचा हा निर्माता म्हणून पहिलाच सिनेमा असून ‘डोलकीच्या तालावर’ या सिनेमानंतर लेखक-दिग्दर्शक किशोर विभांडिक यांचा हा दुसरा सिनेमा आहे. येत्या १२ डिसेंबरला ‘लव्ह फॅक्टर’ हा सिनेमा महाराष्ट्राच्या कानाकोप-यात प्रदर्शित होत आहे.
आजची तरूण पिढी ख-या प्रेमाला पोरकी झाली आहे, त्याग म्हणजे प्रेम आणि प्रेम म्हणजे त्याग अशी खरी प्रेमाची व्याख्या सांगणारा हा सिनेमा आहे, आजचा तरूण वर्ग प्रेमाची त्यांना भलतीच विचित्र तयार केली आहे, केवळ शारिरीक आकर्षण, सौंदर्य यापलिकडे खरं प्रेम म्हणजे आज अभावानेच पाहायला मिळतं, अश्याच विषयावर भाष्य करणारा ‘लव्ह फॅक्टर’ हा सिनेमा आहे. या धमाल सिनेमात मराठी-हिंदी सिनेमातील प्रसिद्ध अभिनेता राजेश शृंगारपुरे प्रथमच रोमॅंटीक भूमिकेत दिसेल त्याच्या सोबत खुशबू तावडे, कुशल बद्रिके, हर्षदा भावसार, प्रतिभा भगत हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा येत्या १२ डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
Anita Sangle of Vaibhavalakshmi Builders and Developers and Union Commerce and Industry Minister Piyush Goyal
नवोन्मेषाचा ‘तेजांकित’ सोहळा…
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र