News Flash

आठवडाभर आधीच साजरा होणार ‘शिमगा’

या चित्रपटामध्ये  राजेश शृंगारपुरे आणि भूषण प्रधान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

शिमगा म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो कोकणी माणसाचा उत्साह. कोकणातील सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेचं दर्शन घडवणारा हा सण. होळीचा सण म्हणजे मनातलं, दारातलं, घरातील सर्व वाईट, अमंगळ, अभद्र जाळून टाकायचा सण. कोणीही कोणाबद्दल आकस धरू नये, वैर धरू नये, सर्व वाईट विचार या होळीच्या अग्नीत राख करून टाकावेत, अशी महती असणाऱ्या या शिमगोत्सवाची संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस एखाद्या चातकाप्रमाणे वाट पाहात असतो. एरव्ही देवाचं दर्शन घ्यायला आपण देवळात जातो, मात्र शिमग्याला देव देवळातून पालखीत विराजमान होतात आणि भक्तांच्या घरोघरी दर्शन देण्यासाठी जातात आणि त्यांच्या स्वागतासाठी मुंबई, पुण्यातील चाकरमानी, मानकरी या दरम्यान कोकणाची वाट धरतात. एकंदरच कोकणात उत्साहाचं, जल्लोषमय वातावरण असतं. अशीच जोशपूर्ण कथा ‘शिमगा’ या आगामी चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

श्री केळमाई भवानी प्रॉडक्शन निर्मित ‘शिमगा’ या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच सोशल नटवर्किंग साईटवर लॉन्च करण्यात आलं. विशेष म्हणजे हा चित्रपट खऱ्याखुऱ्या शिमग्यापूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये  राजेश शृंगारपुरे आणि भूषण प्रधान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

कोकणात शिमग्याचा उत्स्फुर्त माहोल असतानाच म्हणजेच १५ मार्च रोजी हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे. कोकणचे सुपुत्र निलेश कृष्णाजीराव पालांडे ऊर्फ निलेश कृष्णा दिग्दर्शित व लिखित या चित्रपटाचे संगीत पंकज पडघन यांचे असून गुरु ठाकूर आणि वलय यांची गीते आहेत. चित्रपटाच्या छायाचित्रीकरणाची धुरा अनिकेत खंडागळे यांनी सांभाळली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2019 6:14 pm

Web Title: upcoming marathi movie shimga
Next Stories
1 ‘ठाकरे’ ला आवाज कुणाचा? बाळासाहेबांचाच! बदललेला ट्रेलर पाहिलात?
2 शिवसेनेच्या फायद्यासाठी ‘ठाकरे’ चित्रपट काढला नाही- संजय राऊत
3 ‘फन्ने खान’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर
Just Now!
X