News Flash

‘उरी’ ठरला नवीन वर्षाचा पहिला सुपरहिट; आठवड्याभरात चार चित्रपटांना टाकलं मागे

विकी कौशलच्या करिअरमधील हा सर्वांत महत्त्वपूर्ण चित्रपट म्हणता येईल.

'उरी'

विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ हा नवीन वर्षातील सुपरहिट चित्रपट ठरला आहे. अवघ्या आठवड्याभरात या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर तब्बल ७०.९४ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. विकी कौशलच्या करिअरमधील हा सर्वांत महत्त्वपूर्ण चित्रपट म्हणता येईल. कारण या सात दिवसांच्या कमाईसोबतच ‘उरी’ने चार चित्रपटांना मागे टाकलं आहे.

‘ये हिंदुस्तान चुप नहीं बैठेगा, ये नया हिंदुस्तान है. ये घर मै घुसेगा भी और मारेगा भी’, असं म्हणत ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटातून भारताच्या सूडाची कहाणी सांगण्यात आली. विकी कौशल आणि यामी गौतम यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून कौतुकाची थाप मिळत आहे.

जम्मू- काश्मीरमधील उरी इथल्या लष्कराच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केलानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून सर्जिकल स्ट्राईक केला होता. या सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. ‘उरी’ने आठवड्याभरातील कमाईच्या बाबतीत ‘सोनू के टिटू की स्वीटी’, ‘राजी’, ‘स्त्री’ आणि ‘बधाई हो’ या चार चित्रपटांना मागे टाकलं आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने ट्विटरवर यासंदर्भातील माहिती दिली आहे.

‘उरी’ची सात दिवसांची कमाई-

शुक्रवार- ८.२० कोटी रुपये
शनिवार- १२.४३ कोटी रुपये
रविवार- १५.१० कोटी रुपये
सोमवार- १०.५१ कोटी रुपये
मंगळवार- ९.५७ कोटी रुपये
बुधवार- ७.७३ कोटी रुपये
गुरुवार- ७.४० कोटी रुपये

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2019 4:34 pm

Web Title: uri the surgical strike hits the jackpot collects higher than sktks raazi stree and badhaai ho in week 1
Next Stories
1 संजय दत्त कारागृहात असताना बाळासाहेबांकडून रोज जायचा ‘हा’ मेसेज
2 ‘मणिकर्णिका’च्या यशासाठी कंगनाचं कुलदैवतेला साकडं
3 Video : सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखलेचा ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर प्रदर्शित
Just Now!
X