News Flash

यामी गौतम विवाहबद्ध

गेल्या आठवड्यात यामीनेही गुपचूप गुपचूप लग्नगाठ बांधून घेतली आहे.

‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’, ‘काबिल’, ‘बाला’सारख्या चित्रपटांमधून नावारूपाला आलेली अभिनेत्री यामी गौतमचा विवाह दिग्दर्शक आदित्य धरशी संपन्न झाला आहे. अनुष्का, दीपिकानंतर एकीकडे हिंदी चित्रपटसृष्टीला रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची लग्नगाठ कधी बांधली जाते याची उत्सुकता सतावते आहे. मात्र त्यांच्या दोघांच्या लग्नाची गोष्ट पुढेच सरकत नसली तरी या काळात काही अभिनेत्री आपली चित्रपट कारकीर्द सांभाळत वैयक्तिक आयुष्यात स्थिरस्थावर होण्याचा निर्णय घेताना दिसत आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अगरवालचा विवाह संपन्न झाला होता. तर गेल्या आठवड्यात यामीनेही गुपचूप गुपचूप लग्नगाठ बांधून घेतली आहे.

यामी आणि दिग्दर्शक आदित्य धर यांनी ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटात एकत्र काम के ले होते. ‘उरी’ हा आदित्यचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट होता. पहिल्याच चित्रपटातून अमाप यश मिळवणाऱ्या आदित्यने याआधी ‘काबूल एक्स्प्रेस’, ‘तेज’, ‘आक्रोश’सारख्या चित्रपटांसाठी गीतकार, पटकथाकार अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. तर हिमाचल प्रदेशमध्ये जन्मलेल्या यामीनेही गेल्या काही वर्षात अभिनेत्री म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण के ले आहे. या दोघांच्या विवाहाची अचानक आलेली वार्ता त्यांच्या चाहत्यांसाठी आश्चर्याचा सुखद धक्का ठरली आहे. आपल्या मोजक्या कु टुंबीयांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला असल्याची माहिती या दोघांनी आपापल्या समाजमाध्यमांवरून दिली आहे. सध्या यामी ‘दसवी’ या चित्रपटात अभिषेक बच्चनबरोबर मुख्य भूमिके त दिसणार आहे. गेल्या वर्षी टाळेबंदी उठल्यानंतर या चित्रपटाचे चित्रीकरण सलगपणे पूर्ण करण्यात आले होते. तर आदित्य धर ‘इमॉर्टल अश्वत्थामा’ हा त्याचा दुसरा चित्रपट करतो आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक आदित्य धर आणि अभिनेता विकी कौशल ही जोडगोळी पुन्हा एकत्र काम करताना दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2021 12:06 am

Web Title: uri the surgical strike kabil marriage of actress yami gautam akp 94
Next Stories
1 ‘पंच’पुरते उरले विनोद…
2 शिवविचार!
3 केवळ जुन्या जाणत्यांच्या जिवावर…
Just Now!
X