17 January 2021

News Flash

#UriTheSurgicalStrike : महिन्याभरात उरीची बक्कळ कमाई

विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट ११ जानेवारीला प्रदर्शित झाला होता

उरी

भारताच्या सूडाची कहाणी सांगणारा ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’ हा चित्रपट गेल्या महिन्यात प्रदर्शित झाला. विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट २०१८ मधला सर्वात सुपरहिट चित्रपट ठरला होता. या चित्रपटला एक महिना पूर्ण झालाय आणि या चित्रपटानं महिन्याभरात बक्कळ कमाई केली आहे. आतापर्यंत या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर २०० कोटींचा टप्पा पार केला आहे.

वाचा : असा झाला ‘How’s the Josh?’ या डायलॉगचा जन्म…

जम्मू- काश्मीरमधील उरी इथल्या लष्कराच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून सर्जिकल स्ट्राईक केला होता. या सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर महिन्याभरात २१४.५६ कोटींची कमाई केली आहे. पहिल्या पाच दिवसांत ५० कोटींची कमाई करून या चित्रपटानं अनेक सुपरहिट चित्रपटांचे विक्रम मोडले होते.

वाचा : जाणून घ्या ‘उरी’ सिनेमाच्या निर्मितीमागील ‘पाकिस्तान कनेक्शन’

विकीसोबत यामी गौतम, परेश रावलदेखील प्रमुख भूमिकेत या चित्रपटात पहायला मिळत आहेत. आदित्य धार या चित्रपटाचे दिग्दर्शक, लेखक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2019 4:13 pm

Web Title: uri the surgical strike one month box office collection
Next Stories
1 ‘राम के नाम’ माहितीपटाला युट्युबवर ‘U’ ऐवजी ‘A’ प्रमाणपत्र
2 ती अखेरची भेट; माधुरीने दिला श्रीदेवी यांच्या आठवणींना उजाळा
3 Video : व्हॅलेंटाइन डे निमित्त ‘वेडिंगचा शिनेमा’ चित्रपटातील खास गाणे
Just Now!
X