मराठी चित्रपटांवर आपल्या अभिनयाची मोहोर उमटविणारी उर्मिला कानेटकर-कोठारे तिच्या नृत्यासाठीदेखील तितकीच ओळखली जाते. उर्मिला ही स्वतः एक कथ्थक नर्तिका आहे. तिने प्रसिद्ध कथ्थक गुरू आशा जोगळेकर यांच्याकडे कथ्थकचे शिक्षण घेतले आहे. नाविन्याची आवड असलेली उर्मिला सध्या एरियल सिल्क नृत्य प्रकार शिकत आहे. या विषयी बोलताना ती म्हणाली, लहानपणापासूनच मला नृत्याची आवड आहे. म्हणून मी शास्रीय नृत्य शिकले. पण एरियल नृत्य शिकणे आता शक्य होत आहे. आपला हा मुद्दा अधिक स्पष्ट करताना उर्मिला पुढे सांगू लागली , हे नृत्य देखिल आपण शिकावे असे वाटत होते पण मला म्हणावा तसा आत्मविश्वास येत नव्हता. ते अवघड वा अशक्यप्राय आहे असेच वाटत होते. पण नृत्य शिक्षिका आदिती देशपांडे हिने मला आत्मविश्वास दिला व.जवळपास एक वर्ष हे नृत्य मी शिकत असून त्याचा आनंद देखिल घेत आहे. आदिती देशपांडे हिनेच सुश्मिता सेनला हे नृत्य शिकवले आहे. या नृत्यात साहस आहे , रोमांच आहे. एक प्रकारे मल्लखांबा आणि रोपवरील साहसासारखे हे नृत्य आहे. या नृत्याचा चित्रपटासाठी कसा आणि काय फायदा होऊ शकतो असे विचारता उर्मिला म्हणली , हो तर चित्रपटात अशा नृत्याला संधी मिळेलच. पण विविध सोहळ्यात हे नृत्य खूपच वेगळे ठरेल व नक्कीच लोकप्रिय होईल असे वाटते. लावणी, कोळी नृत्य, प्रेमनृत्य आणि आयटेम नृत्य या चौकटीबाहेर पडण्याची चांगली संधी म्हणून या एरियल सिल्क नृत्याचा फायदा होईल. रसिकांनाही त्यामुळे काही वेगळे पाहिल्याचे समाधान मिळेल.उर्मिला या गप्पा संपवत म्हणाली.

urmila-kothare

urmila-kothare-02

urmila-kothare-01