30 September 2020

News Flash

Video : उर्मिला कोठारेच्या मुलीने पूर्ण केला टास्क, पाहा गोंडस अंदाज

तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

आजकाल सोशल मीडियावर स्टार किड्स सतत चर्चेत असते. यामध्ये अभिनेता सैफ आणि अभिनेत्री करिनाचा मुलगा तैमुर, अभिनेत्री सोहा अली खानची मुलगी इनाया, अभिनेता सलमान खानचा भाचा आहिल यांचा समोवश आहे. पण या यादीमध्ये मराठी स्टार किडचा देखील समोवेश आहे. आणि यादीमधील ते नाव म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीमधील एक अतिशय लोकप्रिय अभिनेते महेश कोठारे यांची नात जिजा कोठारे. जिजाचे फोटो आणि व्हिडीओ सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

अभिनेत्री उर्मिला कोठारे सध्या लॉकडाउनच्या काळात पूर्ण वेळ जिजासोबत घालवत असल्याचे दिसत आहे. ती सतत जिजासोबतचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करताना दिसते. पण सध्या चर्चा सुरु आहे ती उर्मिलाने जिजाला दिलेल्या एका टास्कची. गोंडस जिजाने आईने दिलेला टास्क पूर्ण केला आहे.

उर्मिलाने काही दिवसांपूर्वी जिजाला डब्ब्यांची झाकणे काढून लावण्याचा टास्क दिला होता. त्यांचा हा व्हिडीओ तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जिजा डब्याची झाकणे योग्य पद्धतीने लावताना दिसत आहे. दरम्यान तिचा गोंडस अंदाज पाहण्यासारखा आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2020 4:14 pm

Web Title: urmila kothare gave a task to jiza avb 95
Next Stories
1 केनिया सरकारने लोकांच्या सुरक्षिततेसाठी लढवली अनोखी शक्कल, अभिनेत्याने शेअर केला व्हिडीओ
2 ‘अश्रफ भाटकरची भूमिका साकारणं म्हणजे…’; अभिनेत्रीने शेअर केला अनुभव
3 ‘पुन्हा फालतू ट्विट करू नकोस’; भाजपाच्या आयटी सेलनं सिद्धार्थ चांदेकरला सुनावलं
Just Now!
X