करोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. देशभरातील लाखो लोकांना या प्राणघातक विषाणूची लागण झाली आहे. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे. साध्या डोळ्यांनाही न दिसणाऱ्या एका विषाणूने देशभरातील लोकांचं जनजीवन विस्कळीत केलं आहे. अशा या प्रतिकूल परिस्थितीवर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने प्रतिक्रिया दिली आहे. देशातील करोनाबाधितांच्या संख्येनं ४२ लाखांचा टप्पा ओलांडलाय पण आपण करोना सोडून बाकी सगळ्या विषयांमध्ये लक्ष घालतोय. असं म्हणत तिने नाराजी व्यक्त केली आहे.

ड्रग्स प्रकरणात अभिनेत्री संजना गलरानी अटक; ४ दिवसांत दुसरी अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात

उर्मिला मातोंडकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ती रोखठोकपणे आपलं मत मांडते. यावेळी तिने देशातील करोना संकटावर प्रतिक्रिया दिली आहे. “देशातील करोनाबाधितांच्या संख्येनं ४२ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. सर्वाधिक करोना रुग्णांच्या यादीत आपण ब्राझिलला मागे सोडलं आहे. पण या विषणामध्ये कोणालाही रस नाही. आपण नकोत्या विषयांवर चर्चा करत बसलोय.” अशा आशयाचं ट्विट तिने केलं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर तिचं हे ट्विट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

“तुम्ही स्वत:ला शेरलॉक होम्स समजता का?”; सोन्या अयोध्या ट्रोलर्सवर भडकली

देशात करोना संसर्गाचा उद्रेक झाल्याचे दिसत आहे. करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशातील करोनाबाधितांच्या संख्येने आता ४३ लाखांचा टप्पा देखील ओलांडला आहे. मागील चोवीस तासांमध्ये देशभरात तब्बल ८९ हजार ७०६ नवे करोनाबाधित आढळले असून, १ हजार ११५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या ४३ लाख ७० हजार १२९ वर पोहचली आहे.

देशभरातील ४३ लाख ७० हजार १२९ करोनाबाधितांमध्ये ८ लाख ९७ हजार ३९४ अॅक्टिव्ह रुग्ण, डिस्चार्ज मिळालेले ३३ लाख ९८ हजार ८४५ जण व आतापर्यंत मृत्यू झालेले ७३ हजार ८९० जणांच्या संख्येचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे. देशभरात ८ सप्टेंबरपर्यंत ५,१८,०४,६७७ नमूने तपासण्यात आले आहेत. यातील ११ लाख ५४ हजार ५४९ नमून्यांची काल तपासणी झाली आहे. आयसीएमआरच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आले आहे.