24 November 2020

News Flash

“बनावटी प्रचाराविरोधात मिळाला विजय”; उर्मिला मातोंडकर यांनी मानले चाहत्यांचे आभार

कंगना रणौतच्या टीकेवर उर्मिला मातोंडर यांचं प्रत्युत्तर

उर्मिला मातोंडकर आणि कंगना रणौत या दोन अभिनेत्रींमध्ये सध्या शाब्दिक द्वंद्व सुरु आहे. कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. यामुळे संतापलेल्या उर्मिला यांनी कंगनावर जोरदार टीका केली. या टीकेवर कंगनाने देखील तिखट शब्दात प्रत्युत्तर दिलं. लक्षवेधी बाब म्हणजे प्रत्युत्तर देताना कंगनाने उर्मिला मातोंडकर यांचा उल्लेख सॉफ्ट पॉर्नस्टार असा केला. मात्र तिच्या या वक्तव्यामुळे नाराज झालेल्या मंडळींनी उर्मिला यांची बाजू घेतली. या पाठिंब्यासाठी त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

अवश्य पाहा – “मोदीजी तुम्ही हे काय केल?”; करण जोहरचे आभार मानल्यामुळे कंगना होतेय ट्रोल

“मला पाठिंबा दिल्याबद्दल निष्पक्ष माध्यमं आणि इतर सर्वांचे मनापासून आभार. सर्वसाधारणपणे भारतात विरोधी पक्षाची बाजू फारसं कोणी घेत नाही. त्यामुळे हा दुर्मिळ योग आहे. बनावटी प्रचार करण्यांविरोधात हा आपला विजय आहे.” अशा आशयाचं ट्विट करुन उर्मिला मातोंडकर यांनी पाठिंबा देणाऱ्या सर्व मंडळींचे आभार मानले आहेत. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – आयला हे काय?… अमिताभ यांनी KBC च्या सेटवर वापरलेलं गॅजेट पाहून नेटकरी गोंधळले

यापूर्वी ‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत कंगना रणौतने उर्मिला मातोंडकर यांना सॉफ्ट पॉर्न करणारी अभिनेत्री असं म्हटलं होतं. “उर्मिला मातोंडकर या सॉफ्ट पॉर्न स्टार आहेत. त्या त्यांच्या अभिनयासाठी नक्कीच ओळखल्या जात नाहीत. कशामुळे ओळखल्या जातात मग? सॉफ्ट पॉर्नसाठीच ना? जर त्यांना तिकिट मिळू शकतं तर मला का नाही मिळणार? कोणालाही तिकिट मिळू शकतं.” अशी टीका तिने केली होती. या टीकेमुळे बॉलिवूड विरुद्ध कंगना असा सुरु असलेला वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2020 11:53 am

Web Title: urmila matondkar vs kangana ranaut bollywood cold war mppg 94
Next Stories
1 ‘रंगीला’ चित्रपटाच्या वेळी आमिर खान आठ दिवसांनी एकदा अंघोळ करायचा; कारण…
2 रॉनित रॉय होता आमिर खानचा बॉडीगार्ड; म्हणतो, “आजही लक्षात आहे ती शिकवण”
3 “थोडक्यात बचावले”; शबाना आझमींनी सांगितल्या ‘त्या’ अपघाताच्या कटू आठवणी
Just Now!
X