20 January 2021

News Flash

उर्मिला मातोंडकर यांची इन्स्टाग्राम पोस्ट, फोटो शेअर करून म्हणतात…

फोटोखालील कॅप्शन लक्ष वेधून घेणारे

संग्रहित छायाचित्र

बॉलिवूडमधील मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी मंगळवारी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत उर्मिला मातोंडकर यांनी हातावर शिवबंधन बांधत नव्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. त्याआधी उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेकडून पक्षप्रवेशाबाबत कोणताही आग्रह धरण्यात आलेला नव्हता, पण मी स्वत:हूनच सक्रिय राजकारणात परतण्यासाठी निर्णय घेतला, असं त्यांनी पक्षप्रवेशानंतर सांगितलं. त्यानंतर एका इन्स्टाग्राम पोस्टमुळे त्या चर्चेत आल्या आहेत.

उर्मिला यांनी आपल्या पक्षप्रवेशाच्या वेळी आणि त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत फिकट हिरव्या रंगाची साडी परिधान केली होती. त्या साडीतील दोन फोटो त्यांनी इन्स्टाग्रावर शेअर केले होते. त्यानंतर त्यांनी वेगळी साडी परिधान करून एक फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या फोटोखाली त्यांनी लिहीलेली कॅप्शन साऱ्यांचं लक्ष वेधून घेणारी आहे. “(माझ्याकडून) नेहमीच तुम्हा सर्वांना सकारात्मक ऊर्जा, प्रेम, कारूण्य आणि सदिच्छा मिळत राहतील”, असं म्हणत त्यांनी सर्व फॉलोअर्सना सुप्रभात म्हटले आहे.

आणखी वाचा- बॉलिवूडमध्ये घाटी संबोधलं जाण्यापासून ते शिवसैनिक; असा आहे उर्मिला मातोंडकरांचा संघर्ष

दरम्यान, पक्षप्रवेशानंतर उर्मिला यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. “सिनेसृष्टीत कारकीर्द सुरु केली, तेव्हा मी साध्यासुध्या मराठी घरातून आलेली मुलगी होते. मी ‘पिपलमेड’ स्टार आहे, त्याचप्रमाणे आता मला ‘पिपलमेड लीडर’ व्हायला आवडेल. करोनाच्या कठीण काळात महाविकास आघाडीने खूप चांगलं काम केलं आहे. शिवसेना प्रवेशासाठी माझ्यावर कोणताही दबाव नव्हता. शिवसेनेच्या भक्कम अशा महिला आघाडीचा मी एक भाग झाले याचा मला सार्थ अभिमान आहे. काँग्रेसमध्ये होते तेव्हाही मला पदाची अपेक्षा नव्हती. आज शिवसेनेत आले तरीही पदाची अपेक्षा नाही. मला लोकांसाठी काम करायचं आहे आणि शिवसैनिक म्हणून मी शिवसेनेत काम करणार आहे”, असे उर्मिला मातोंडकर म्हणाल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2020 10:55 am

Web Title: urmila matondkar who joined shiv sena posts gorgeous instagram photo gives superb caption uddhav thackeray maharashtra politics vjb 91
Next Stories
1 जामिनावर सुटलेल्या भारतीने आदित्य नारायणच्या लग्नात धरला ठेका; पाहा व्हिडीओ
2 रिअ‍ॅलिटी शोमध्ये परीक्षकांकडून होणाऱ्या टिप्पणीबाबत धर्मेश म्हणतो..
3 कार्तिक आर्यन- जान्हवी कपूर यांच्यात नेमकं शिजतंय तरी काय?
Just Now!
X