News Flash

तुम्हाला काय वाटलं इतक्या सहज निघून जाईन?; कोमोलिका आता झाली करोनिका

कोमोलिकाचा करोनिका अवतार व्हायरल

‘कसौटी जिंदगी की’ या सुपरहिट मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री उर्वशी ढोलकिया पुन्हा एकदा चर्चेत आहे. या मालिकेत तिने कोमोलिका ही व्यक्तिरेखा साकारली होती. खलनायिकेच्या भूमिकेत झळकलेल्या कोमोलिकाच्या मादक अदा पाहून प्रेक्षक अगदी घायाळ होत असत. मात्र तिची ही अदा आता पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. यावेळी उर्वशी कोमोलिका म्हणून नव्हे तर चक्क करोनिका म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

नेमकं काय केलं आहे उर्वशीने?

उर्वशीने ‘कसौटी जिंदगी की’ मालिकेतील एक लहानसा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यामध्ये ती म्हणते, “तुम्ही लोकं किती मूर्ख आहात, तुम्हाला काय वाटलं मी इतक्या सहज निघून जाईन.” या व्हिडीओखाली तिने ‘कहानी करोनिका की’असं कॅप्शन दिलं आहे.

करोना विषाणूला रोखण्यासाठी सरकारने लॉकडाउन जारी केला आहे. मात्र लॉकडाउन असतानाही करोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. या पार्श्वभूमीवर करोना विषाणूचं मनोगत उर्वशीने करोनिका या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून सादर केलं आहे. उर्वशीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. गेला बराच काळ उर्वशी मालिकांपासून दूर आहे. त्यामुळे या नव्या व्हिडीओमुळे तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावर निर्माण झाले आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 12:59 pm

Web Title: urvashi dholakia komolika turns coronikaaa mppg 94
Next Stories
1 रामायण : हनुमानाने पर्वत उचलताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
2 “करोनामुळे देशाचा खूप मोठा फायदा”; दिग्दर्शकाचं अजब ट्विट
3 चार्ली चॅप्लिन यांचा मृतदेह गेला होता चोरीला; वाचा संपूर्ण जगाला हादरवणारी घटना
Just Now!
X