News Flash

उर्वशी रौतेलाने गौतम गुलाटीसोबत केलं लग्न?; फोटो पोस्ट करुन म्हणतोय शुभेच्छा द्या

काय आहे उर्वशीच्या लग्नाच्या व्हायरल फोटोमागील सत्य?

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. आपल्या मादक फोटो आणि व्हिडीओजमुळे ती नेहमीच चर्चेत असते. मात्र यावेळी ती चक्क लग्नाच्या फोटोमुळे चर्चेत आहे. होय, अभिनेता गौतम गुलाटीसोबत लग्न करतानाचा तिचा फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा फोटो पाहून, खरंच उर्वशीने लग्न केलं का? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.

सर्वप्रथम गौतम गुलाटीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा फोटो पोस्ट केला होता. “तुम्ही आम्हाला शुभेच्छा देणार नाही का?” अशी कॉमेंटही या फोटोवर लिहिली होती. त्यामुळे चाहत्यांचा गोंधळ आणखी वाढला. परंतु खरं म्हणजे गौतमने उर्वशीसोबत लग्न केलेलं नाही. हा फोटो त्यांच्या आगामी वेब सीरिजमधील आहे. ‘वर्जिन भानुप्रिया’ नावाची एक वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सीरिजमध्ये उर्वशी आणि गौतम मुख्य व्यक्तिरेखा साकारणार आहेत. ‘वर्जिन भानुप्रिया’मधील एका सीनचा फोटो गौतमने पोस्ट केला होता.

‘वर्जिन भानुप्रिया’चा ट्रेलरही सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ही सीरिज येत्या १६ जुलैला झी 5 वर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजचा ट्रेलर १६ लाखांपेक्षा अधिक वेळा पाहिला गेला आहे. ‘वर्जिन भानुप्रिया’च्या माध्यमातून उर्वशी रौतेला वेब प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2020 10:35 am

Web Title: urvashi rautela and gautam gulatis wedding photo viral mppg 94
Next Stories
1 लहान मुलासोबत खेळतानाचा सुशांतचा व्हिडीओ व्हायरल…
2 तुझ्याशी लग्न करायचे आहे असे म्हणणाऱ्या चाहतीला आर. माधवनने विचारला प्रश्न
3 मिका सिंगची सोनू निगमवर टीका, म्हणाला…
Just Now!
X