News Flash

हॉटेलमध्ये केलेल्या ‘त्या’ चुकीसाठी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत उर्वशीने मागितली माफी

उर्वशीने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत उर्वशीने जाहिर माफी मागितली आहे.

उर्वशीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. (Photo Credit : Urvashi Rautela Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ही लोकप्रिय अभिनेत्रीं पैकी एक आहे. उर्वशी सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. कधी तिच्या कपड्यांमुळे तर कधी तिच्या बोल्ड अंदाजामुळे. उर्वशीचे चाहते फक्त भारतात नाही तर परदेशात ही आहेत. नुकतीच उर्वशी चित्रकरणासाठी युरोपला गेली होती. मात्र, तिथे उर्वशीकडून एक चूक झाली आहे. त्या चुकीसाठी उर्वशीने एक व्हिडीओ शेअर करत जाहिरपणे माफी देखील मागितली आहे.

आणखी वाचा : अथिया शेट्टी व केएल राहुल इंग्लंडमध्ये एकत्र? इन्स्टा पोस्टनंतर चाहत्यांमध्ये चर्चा

उर्वशीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ उर्वशीच्या एका चाहत्याचा असल्याचे दिसत आहे. उर्वशी युरोपमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबली होती त्या हॉटेलमध्ये उर्वशीचे ५० ते ६० चाहते तिला भेटण्यासाठी आले होते. हे चाहते ७२ तास न झोपता तिथे उभे होते. परंतु, जेव्हा उर्वशी हॉटेलबाहेर आली तेव्हा तिने तिथे उपस्थित काही चाहत्यांसोबत फोटो काढले आणि घाईत असल्याने निघून गेली. उर्वशीचं हे वागणं न आवडलेल्या एका चाहत्याने व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला. तो व्हिडीओ शेअर करत उर्वशीने त्याची माफी मागितली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by (@urvashirautela)

आणखी वाचा : Video : असा साजरा केला शिल्पा शेट्टीने आपला ४६ वा वाढदिवस

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर उर्वशीचे किती चाहते आहेत याचा अंदाज आपल्याला आला आहे. त्या चाहत्यांची माफी मागतं उर्वशीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. “युरोपमध्ये असलेल्या माझ्या सगळ्या चाहत्यांची मी माफी मागते. तुम्ही सगळे माझी वाट पाहत ७२ तास हॉटेल बाहेर थांबला होतात. त्यावेळी मला बरं वाटतं नसल्याने मी तुम्हाला जास्त वेळ देऊ शकली नाही. माझं तुम्हा सगळ्यांवर प्रेम आहे. मी तुमचा सन्मान करते. कृपया व्हिडीओमध्ये असलेल्या मुलाला टॅग करा. त्याला शोधण्यासाठी मला मदत करा. मी त्याला वैयक्तिकरित्या भेटून येईल. मला खरचं माफ करा,” असे कॅप्शन उर्वशीने तो व्हिडीओ शेअर करतं दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 4:01 pm

Web Title: urvashi rautela apologize fans who were waiting or actress for 72 hours outside her hotel dcp 98
Next Stories
1 करोनाविरोधात बुद्धिबळाच्या पटावर गायक अरिजीत सिंह; विश्वनाथन आनंदसोबत रंगणार सामना
2 शुभ्रा मोडणार सुझॅनची खोड, ‘अग्गबाई सूनबाई’मध्ये नवे वळण
3 म्यानमारहून भारतात पायी चालत आल्या होत्या हेलन; ‘द कपिल शर्मा शो’मध्ये केला होता खुलासा
Just Now!
X