News Flash

उर्वशी रौतेलाने पहिल्याच तमिळ चित्रपटासाठी घेतले ‘एवढे’ मानधन; आकडा वाचून व्हाल चकीत!

तमिळ चित्रपटसृष्टीत करत आहे पदार्पण

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला लवकरच तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. तिच्या या चित्रपटाचं नाव अद्याप ठरायचं असलं तरी ही एक सायफाय फिल्म आहे हे मात्र कळत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत सुप्रसिद्ध तमिळ अभिनेते सरवनन असणार आहेत. हा चित्रपट बिग बजेट असणार आहे.

उर्वशीने ‘व्हर्जिन भानुप्रिया’, ‘पागलपंती’, ‘सिंग साब द ग्रेट’, ‘सनम रे’ अशा बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. तर ‘लव्ह डोस’, ‘बिजली का तार’, ‘तेरी लोड वे’, ‘एक लडकी भीगी भागी सी’ अशा गाण्यांच्या अल्बम्समध्येही काम केलं आहे. आता ती तिच्या तमिळ चित्रपटातून दक्षिणेतही आपले चाहते निर्माण करणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by URVASHI RAUTELA (@urvashirautela)

या बिग बजेट चित्रपटात उर्वशी एका मायक्रोबायोलॉजिस्टची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट अनेक भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच ती तिचे सहकलाकार सरवनन यांच्यासोबत मनाली इथे चित्रीकरण करताना दिसून आली. डिएनएच्या वृत्तानुसार, उर्वशी रौतेलाने या चित्रपटासाठी १० कोटी रुपये मानधन घेतल्याचं समोर आलं आहे. ती आता तमिळ चित्रपटसृष्टीतली सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे.

अभिनेत्री दिपिका पादुकोनने २०१४मध्ये तमिळमधला ‘कोचाडैयन’ हा चित्रपट केला तर अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनसने ‘तमिझान’ हा चित्रपट २००२ साली केला होता. या दोघींनाही मागे टाकत उर्वशी आता पहिल्याच तमिळ चित्रपटाला सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे.
अफवा होती की, या बिग बजेट चित्रपटात अभिनेत्री आलिया भट काम करणार आहे. मात्र, उर्वशी रौतेलाने चित्रीकरणाला सुरुवात केल्यानंतर ही अफवा विरुन गेली.

उर्वशी ‘ब्लॅक रोझ’ या चित्रपटातून तेलुगू चित्रपटसृष्टीतही पदार्पण करत आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. उर्वशी लवकरच अभिनेता रणदीप हुडासोबत ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेबसीरीजमध्ये दिसणार आहे. त्याचबरोबर गायक गुरु रंधावासोबत ‘मर जाएंगे’ या गाण्यातही ती दिसणार आहे. ती एका आंतरराष्ट्रीय म्युझिक व्हिडिओमध्येही इजिप्शियन अभिनेता मोहम्मद रमादान याच्यासोबत दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2021 5:19 pm

Web Title: urvashi rautela charges this large amount for her upcoming tamil film vsk 98
Next Stories
1 ‘लॉकडाउनसाठी तयार’, आमिरच्या मुलीने शेअर केला बॉयफ्रेंडसोबतचा फोटो
2 मिलिंद सोमणला राहवेना….करोनातून उठला आणि गाठला रस्ता!
3 रणवीरने दिल्या अजिंक्य रहाणेला शुभेच्छा; मैदानात सिम्बासोबत अजिंक्यची फटकेबाजी
Just Now!
X