27 September 2020

News Flash

‘त्या’ ट्विटमुळे उर्वशी आली अडचणीत; होतोय चोरीचा आरोप

अमेरिकन लेखकाने उर्वशीवर केला चोरीचा आरोप

‘पॅरासाईट’ या चित्रपटाने संपूर्ण जगाचे लक्ष कोरियन सिनेसृष्टीकडे वळवले. या चित्रपटाने यंदाच्या ऑस्कर पुरस्कारावर आपले नाव कोरले. ‘पॅरासाईट’चे जगभरातून कौतुक करण्यात आले. बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने देखील या चित्रपटाची स्तुती करणारे एक ट्विट केले होते. मात्र या ट्विटमुळे आता ती अडचणीत सापडली आहे. एका अमेरिकन लेखकाने तिच्यावर चक्क ट्विट चोरीचा आरोप केला आहे.

या लेखकाने ‘पारासाईट’ चित्रपटाबद्दलच आपलं मत ट्विट केलं होतं. हे ट्विट उर्वशीने हुबेहुब कॉपी केलं. किंबहुना हे ट्विट तिने जसंच्या तसं आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट केलं. या दोन्ही ट्विटमधील फरक अमेरिकन लेखकाने उर्वशीला विचारला आहे. या ट्विटमुळे तिला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली. अखेर ट्रोलिंगमुळे वैतागलेल्या उर्वशीने याबाबत स्पष्टीकरण देखील दिलं. तिच्या मते हे ट्विट तिने नाही तर तिच्या पीआर टीमनं केलं होतं.

खरं तर यापूर्वी ही अनेकदा तिच्यावर ट्विट चोरीचे आरोप लावण्यात आले आहेत. अभिनेत्री शबाना आझमी यांचा अपघात झाला होता. तेव्हा त्यांना धीर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट केलं होतं. हे ट्विट उर्वशीने जसंच्या तसं कॉपी केलं होतं. यापूर्वी प्रसिद्ध मॉडेल गिगी हादिद हिने केलेली एक इन्स्टा पोस्ट देखील तिने जशीच्या तशी स्वत:च्या अकाऊंटवर कॉपी पेस्ट केली होती. त्यामुळे स्पष्टीकरण दिल्यावरही नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवण्याचे अद्याप थांबवलेले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2020 6:52 pm

Web Title: urvashi rautela copy paste the parasite tweet mppg 94
Next Stories
1 ‘२१ दुणे ४२’मध्ये आज बाबासाहेब पुरंदरे अन् डॉ. निर्मोही फडके यांच्या कथांचं अभिवाचन
2 ‘द फ्लॅश’मधील अभिनेत्याचे वयाच्या १६व्या वर्षी निधन
3 दीपिका मध्यरात्री उठून करते ‘हे’ काम; लग्नाच्या दीड वर्षांनंतर रणवीरने केला खुलासा
Just Now!
X