News Flash

‘त्या’ ट्विटमुळे उर्वशी अडचणीत; होतोय चोरीचा आरोप

सिद्धार्थ मल्होत्रामुळे होतोय उर्वशीवर चोरीचा आरोप

लॉकडाउनच्या काळात ‘ऑन ड्युटी’ असणाऱ्या पोलिसांनी २१ दिवसात काय केलं असतं, यासंदर्भातील आपल्या इच्छा व्यक्त करणारं एक ट्विट केलं होतं. या व्हिडिओवर बॉलिवूडमधील अनेक कलाकार फिदा झाले. अनेकांनी ट्विट करुन मुंबई पोलिसच खरे सुपर हिरो असल्याचं सांगत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. असंच एक कौतुक करणारं ट्विट अभिनेत्री उर्वशी रौतेलाने देखील केलं होतं. मात्र या ट्विटमुळे आता ती अडचणीत सापडली आहे. नेटकऱ्यांनी तिच्यावर चक्क ट्विट चोरीचा आरोप केला आहे.

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याने एक ट्विट केलं होतं. या ट्विटची हुबेहुब नक्कल उर्वशीने केली आहे. त्यामुळे नेटकरी तिला या दोन ट्विटमधील फरक विचारत आहेत. या ट्विटमुळे तिला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

खरं तर यापूर्वी ही अनेकदा तिच्यावर ट्विट चोरीचे आरोप लावण्यात आले आहेत. अभिनेत्री शबाना आझमी यांचा अपघात झाला होता. तेव्हा त्यांना धीर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट केलं होतं. हे ट्विट उर्वशीने जसंच्या तसं कॉपी केलं होतं. यापूर्वी प्रसिद्ध मॉडेल गिगी हादिद हिने केलेली एक इन्स्टा पोस्ट देखील तिने जशीच्या तशी स्वत:च्या अकाऊंटवर कॉपी पेस्ट केली होती. त्यामुळे स्पष्टीकरण दिल्यावरही नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवण्याचे अद्याप थांबवलेले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2020 4:50 pm

Web Title: urvashi rautela copy paste tweet sidharth malhotra mppg 94
Next Stories
1 ‘तारक मेहता…’मधील या कलाकाराच्या इमारतीत तीन करोनाग्रस्त; सोसायटी सील
2 लॉकडाउनमध्ये प्रेक्षकांचं होणार मनोरंजन; पाहा उर्वशीचं नवं आयटम साँग
3 मालिकेतील ‘रावण’ खऱ्या आयुष्यात असतात रामभक्तीत लीन; ‘रामायण’ पाहून म्हणाले…
Just Now!
X